*ऑनलाईनच्या युगात चिमुकल्यांच्या हातातील पाटी-पेन्सिल कालबाह्य*
दि. 6 - उस्मानाबाद -
*अभ्यास करण्यासाठी आज नवनवीन साधने उपलब्ध आहेत. टॅब, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा वापर करून शाळेत शिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक पद्धतीमुळे दप्तरामधील पाटी पेन्सिल कालबाह्य होत आहे.*
*- राहुल अंधारे, शिक्षक, माणकेश्वर*
साधारण दोन दशकापूर्वीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सिलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाईन शिक्षणाला गती आली असून, यामुळे पाटी-पेन्सिल कालबाह्य झाल्याचे दिसून येते.
शिक्षणात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. आता शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून, मागील काही वर्षांपासून तर संगणक, मोबाइल आणि टॅबलेटवरच शिक्षणाचे धडे गिरविले जात आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर इत्यादींचा वापर केला जात आहे.
ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांना एकसमान ऑनलाइन शिक्षण मिळत असून, पाटी लेखनाची जागा मोबाइलने घेतली आहे. पहिल्या वर्गामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचा श्रीगणेशादेखील मोबाइलवरच होऊ लागला आहे. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणप्रणाली ग्रामीण भागात नेटवर्कचा अडसर ठरत आहे.
Web Blog👆
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*
*उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.