फरीद शेख यास पोलीस कडुन बेदम मारहाण...
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीसांनी केलेल्या एका मारहाणी मुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कायदा व सुव्यवस्था आणि पोलीसांची कामगिरी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास फरीद शेख (26, समर्थनगर) हा तरुण उभारला होता, त्यावेळी आनंद नगर पोलीस स्टेशन चे पो. नि. चव्हाण आणि त्यांच्या चालक पठाण आले आणि पान सुपारी ची मागणी केली. परंतु समोर 2 ग्राहक असल्यामुळे पान सुपारी लवकर देण्यात आली नाही.
उशीर झाल्याने चालक पठाण याने 'साहेब दिसत नाहीत का? तुला पोलीस चा इंगा दाखविला पाहिजे' म्हनत अश्लील शिवीगाळ चालू केली.
टपरी चालकाचा मित्र फरीद याने पठाण यास शिवीगाळ करु नको म्हणत मध्यस्थी केली असता तुम्ही मध्ये पडु नको म्हणत त्यास ही शिवीगाळ चालू केली. त्यानंतर त्यांने त्याला गाडीत बस म्हणत जबरदस्तीने गाडी त बसवले. व आनंद नगर पोलीस ठाण्यात नेले. आनंद नगर पोलीस ठाण्यात नेऊन पोलीसांनी त्यास रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. फरीद शेख यास मारहाण झाल्याचे समजताच मुस्लिम समाजातील लोक आनंद नगर येथे जमा झाले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांना सांगितला. त्यानंतर फरीद शेख याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे पो. नि. चव्हाण यांचा चालक पठाण हा रजेवर होता.
कुंपण च शेत खायला लागलं तर जायचं कुठं...? असे दिसून आले.
आम्हाला न्याय मिळावी अशी फरीद शेख याच्या नातेवाईकाची मागणी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.