औसा येथे दिव्यांगाच्या वैद्यकीय तपासणी मोहिमेस प्रतिसा

  औसा येथे दिव्यांगाच्या वैद्यकीय तपासणी मोहिमेस प्रतिसाद









 औसा- जिल्हा शल्य चिकित्सक लातूर आणि ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने  येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता दिव्यांगाच्या वैद्यकीय तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 

परिसरातील नागरिकांच्या  मागणीप्रमाणे दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी दिव्यांगाची वैद्यकीय तपासणी आता औसा येथील ग्रामीण रुग्णालयातून होणार असल्यामुळे परिसरातील दिव्यांगांना त्याचा लाभ मिळणार आहे,या शिबिराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एल एस देशमुख यांनी ही सुविधा आता ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. औसा येथील शिबिरांमध्ये एकूण 50 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली असून तपासणीअंती 50 पैकी 35 दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यास पात्र ठरले असल्याची माहिती या शिबिरातून देण्यात आली आहे.दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी दिव्यांगाची वैद्यकीय तपासणी होणार असून प्रत्येक शिबिरामध्ये फक्त 50 दिव्यांगाची तपासणी होणार असल्यामुळे या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या पात्र दिव्यागाने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून टोकन क्रमांक घेतल्यानंतरच दिव्यांगाचे वैद्यकीय तपासणी होणार असल्याची माहिती येथील सूत्रांनी शिबीर स्थळी दिली. या शिबिरामध्ये डॉ राजकुमार दाताळ, डॉ पुरी  ,डॉ विकास पाटील ,डॉ  धनंजय पडवळ, डॉ एस जी पाठक, डॉ  रवींद्र भालेराव,  डॉ प्राची हरिदास यांनी विशेष सहकार्य केले.  या शिबिराच्या यशस्वितेसाठी यशस्वीतेसाठी इन्चार्ज कीरवे  सिस्टर, सरिता देडे, सुनिल शिंदे, कपिल सर्जे, क्ष किरण ,व

वैज्ञानिक अधिकारी मनियार एफ एच  यांनी विशेष सहकार्य केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या