लातुर ग्रामीण पोलीसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला पकडले

 लातुर ग्रामीण पोलीसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला पकडले



पोलीस ठाणे लातुर ग्रामीण हद्दीत मौजे भातांगळी पाटी येथे गावठी पिस्टलसह एकाला ताब्यात घेतले त्या बाबतची अधिक माहीती पुढील प्रमाणे. आज दि. २६.०८.२०२१ रोजी पो.स्टे. लातुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम यांना


गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली कि मौजे भातांगळी येथुन एक ईसम त्याचे एमएच १२ एफएन 1 - १९०५ या क्रमांकाच्या मोटारसायकलवर भातांगळी पाटी मार्गे लातुर कडे जात असुन त्याचे कमरेला एक गावठी कट्ठा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.स्टे. चे पोउपनि श्री चेरले सफौ पांढरे, पोह/ टारपे, लखनगीरे, चालक पोना / केंद्रे यांना सदर बातमीचे ठिकाणी दोन पंचासह रवाना होवुन बातमीतील मोटार सायकलवरील ईसमांवर मौजे भातांगळी पाटी चौकात ११.३० वा. छापा मारला असता वरील क्रमांकाचे मोटार सायकलवर एक ईसम मिळुन आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश रामकिशन बेंबडे रा. भातांगळी असे सांगीतले पंचासमक्ष सदर ईसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल, दोन मॅग्झीन व सहा जिवंत राऊंड व त्याचे ताब्यातील होंडा कंपनीची मोटार सायकल असा मिळुन एकुण ४०,०००/-रु. चा मुद्देमाल मिळुन आला सदर ईसमास ताब्यात घेवुन त्याचेवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व १३५ म.पो.का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कामगीरी मा. निखील पिंगळे पोलीस अधिक्षक लातुर अपर पोलीस अधिक्षक मा.हिंमत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी लातुर ग्रामीण श्रीमती प्रिया पाटील यांचे 1 मार्गदर्शनाखाली लातुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम, पोउपनि श्री तानाजी चेर माधव लोणेकर, सफौ पांढरे, विठ्ठल शेवाळे, पोह/गजानन टारपे, विनोद लखनगीरे, महिला पोलीस राजकन्या नागरगोजे, चालक पोना / चंद्रकांत केंद्रे यांनी कामगीरी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या