औसा न्यायालयात कायदेविषयक शिबिर संपन्न
औसा मुख्तार मणियार
विधी सेवा समिती वकील मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हा न्यायाधीश लातूर यांच्या सूचनेनुसार औसा न्यायालयात दोन दिवसीय कायदेविषयक शिबिराचे दिनांक 26 ऑगस्ट 2021 गुरुवार रोजी व 27 ऑगस्ट 2021 शुक्रवार रोजी दुपारी आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी नागरिकांची कर्तव्ये व नागरिकांना देण्यात येणाऱ्या केंद्र/ राज्य शासनाच्या विविध योजना संबंधीचे सविस्तर असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे औसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ व अडवोकेट ए एस मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औसा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राची आर कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाच्या व्यापक उद्देश व भूमिका स्पष्ट करून कोवीडच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गटविकास अधिकारी यांचा सत्कार केला.
दुसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्ट 2011 रोजी या सत्रामध्ये वृद्ध नागरिकांच्या संबंधी पोटगी मिळण्याचा कायदा व फौजदारी कायदे या अनुषंगाने सविस्तर असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी व अँड ए.ए. फत्तेपुरकर यांनी केले, तर गुन्ह्याच्या उत्कष्ट तपास केल्याने पुरस्कारास पात्र ठरल्या बद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे यांचा विधिज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, त्यांनी तपासा संबंधीचे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष औसा वकील मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट श्रीधर जाधव यांनी कायदेविषयक शिबिराची व्यापकता व त्यासंबंधी सविस्तर असे मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला.
या शिबिराचे सूत्रसंचालन अडवोकेट राजेंद्र पी गिरी यांनी केले, तर आभार अडवोकेट बी एम सगट यांनी मानले, सदरील कायदेविषयक शिबिरास विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.