*" खोटे श्रेय घेणाऱ्या भाजपावाल्यांना औशाची जनता पाणी पाजवेल "*
*" दिव्याखाली अंधार म्हणूनच अपात्र "*
*" शास्त्रशुद्ध आणि विधीवत मंत्रोपचाराने व दुआ करून माकणी ते फिल्टर 37 किमी वरून पाणी औशात दाखल "*
औसा रिपोर्टर
औशाच्या जनतेच्या, व्यापारी, संघटना, छावा, पत्रकार बांधव यांच्या यशस्वी लढ्यानंतर औशाची योजना मंजूर झाली खरी पण नवीन सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन भाजपा सरकारने घेतलेले विकास कामांचे सर्वच निर्णय शासनाच्या दि. 5 डिसेंबर 2019 रोजीच्या निर्णयाने स्थगित करण्यात आले, व गुंडाळण्यात आले. सदरील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना गुंडाळण्याचे संकेत लक्षात घेता मी कार्यादेश मधील सर्व अडथळे दूर करून या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित केले. सदरील कार्यादेश हे नवीन सरकारच्या काळात झालेले आहेत.
मी सन 2016 ला नगराध्यक्ष झाल्यानंतर, 2017 साली सदरील धूळखात पडलेल्या औसा - माकणी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाचे नव्याने अंदाजपत्रक करून त्यातील नव्या दरानुसार डीपीआर तयार केला. तसेच दि. 26 /11 /2018 ला 10 लक्ष रुपये तांत्रिक मान्यतेसाठी मजीप्रा, कार्यालय, लातूर येथे भरले व त्यानंतर 25 लक्ष रुपये ही भरले असे एकूण 35 लक्ष रुपये तांत्रिक मान्यतेसाठी न प निधीतून तांत्रिक फी भरली. यावेळी औशाच्या राजकारणात आमदार श्री अभिमन्यू पवार यांचा प्रवेश ही झाला नव्हता. त्यानंतर सदरील काम रद्द होण्याची कुणकुण लागताच सदरील कामाचे कार्यादेश संबंधित ज्या काही अडचणी होत्या त्या यशस्वीपणे दूर केल्या. त्यासंबंधी वर्तमानपत्रातील कात्रणे ही उपलब्ध आहेत.
सदरील कामासाठी नगर पालिकेचा लोकवाटा हा 10 % टक्के इतका आहे. जो की, न प च्या निधीतूनच देणे आवश्यक असते. त्यासाठी राज्य शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. तसेच यासाठी प्रत्यक्ष काम करताना अतिरिक्त निधी तोही कोटीवर लागला तसेच या कामाचे वाढीव निधी हे न प निधीतूनच द्यावे लागणार होते, व सदरील रक्कमही औसा न प कडे व कोरोना परिस्थितीमुळे नागरिकांनीही कर थकविल्यामुळे देणे शक्य नव्हते किंवा शासनाकडूनही अनुदान येणे बंद झाल्यामुळे देणे अवघड होते व गुत्तेदाराने निधीअभावी काम थांबवले होते. सदरील परिस्थिती मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या कानावर घातली व त्यांनी दि. 7/ 1/ 2021 ला ऑनलाइन झालेल्या बैठकीत औसा नगर पालिकेसाठी लोकवाटासह अतिरिक्त अनुदान मंजूर केले. यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात या कामासाठी कोणतीही निधीची तरतूद केली नव्हती व तत्कालीन सरकारच्या काळात एकही रुपयाचा निधी औसा नगर पालिकेस प्राप्त नाही केवळ निवडणुकीच्या एक महिन्या आधी जाता जाता प्रशासकीय मान्यतेचा कागद हातात देऊन निवडणुकीत मत घेण्याचे काम करण्यात आले आहे.
सदरील औसा - माकणी पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले आहे व औसा फिल्टर स्थळी 37 किमी अंतर पार करून पाणी पडले आहे व या कामाच्या शुभारंभ साठी जिल्हाधिकारी लातूर यांनी दि. 29 /7 /2021 रोजी सर्व तपासणी करून नाहरकत दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामध्ये सदरील पाईपलाईनचे काम हे अर्धवट असल्याबाबत व बेकायदेशीर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ उद्घाटन केले असल्याबाबतचा आरोप केला आहे. तो पूर्णतः चुकीचा आहे. औसा नगर परिषद पाणीपुरवठा योजनामध्ये देखरेख यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे काम पाहते व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले आहे.
माकणी धरणातून औसा फिल्टर स्थळी आवश्यकतेनुसार पाणी घेण्यात येत आहे व त्याचे महावितरणचे लाईटबिलही नगर पालिकेला आले आहे. सदरील कामाचे संपूर्ण श्रेय हे औशाच्या जनतेला व माझे नेते ना. अजित दादा पवार व महाविकास आघाडी सरकारला जाते. ज्यांच्या आर्थिक मदतीशिवाय ही योजना केवळ कागदावरच राहिली असती. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा या तिन्ही नगर पालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत व औसा - माकणी पाणीपुरवठा योजनेच्या 2 वर्षा आधीपासून या योजना पूर्ण निधीसह देऊन सुद्धा आजतगायत उदगीर व अहमदपूर शहरात अद्यापही पाणी आले नाही व तेथे टॅंकरने पाणी पुरवठा चालू आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे. जिल्ह्यातील भाजपाच्या योजना अपयशाचे ठळक उदाहरण आहे.
भारतीय जनता पक्षाने औशाचे व्हीजन नावाखाली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. परंतु त्यांनी 2 वर्षांपूर्वी औशाच्या जनतेस जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या व्हीजनचे काय झाले ? याचे उत्तर त्यांच्याकडेच नाही. औसा नगर पालिकेच्या विविध विकास कामासाठी भाजप आमदारांनी विधानसभेत अनेक तारांकित प्रश्न उपस्थित केली व जिल्हाधिकारी मार्फत तक्रारी देऊन चौकशी लावली त्याअनुषंगाने औसा शहरात नगर पालिकेचे घनकचरा, औसा केदारनाथ मंगल कार्यालय ते निलंगावेस रस्ता इत्यादीसह अनेक कामांची त्रयस्थ पक्ष तपासणी झाली. त्यात एकही काम बोगस आढळले नाही. उलट तांत्रिक मान्यतेच्या दर्जेपेक्षा दर्जेदर आढळले आहे.
तसेच दि. 9 /10!/2016 रोजी मा. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर पालकमंत्री यांच्या शुभहस्ते औसा शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ अरण्यात आला (प्रभाग क्र. 3) व त्या कामास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. त्याची कोनशिला ही आजही मुख्य रस्त्यावरील लेंडी पुलावर आहे. त्यास निधी मात्र आजतागायत आला नाही किंवा त्यापैकी एकही कामाची सुरुवातही झाली नाही. केवळ प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिल्याने योजना पुर्णत्वास येत नाही,
केवळ शहराचे प्रश्नाचे निवेदन दिल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यासाठी शहरावर लक्ष देणारे मोठे असे नेतृत्व लागते जे की आजच्या सरकार मधील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित दादा पवार आहेत त्यांचे सदैव आशीर्वाद आमच्या सोबत आहेत...
डॉ अफसर शेख
नगराध्यक्ष, नगर परिषद औसा..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.