हनमंत कसबे यांच्या स्मृतिदिनी 109 जणांचे उस्फुर्त रक्तदान..
औसा /प्रतिनिधी : - औसा नगर परिषदेचे दिवंगत कर्मचारी हनमंत सदाशिव कसबे यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्रेंड्स क्लब औसा आणि लातूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ॲड बाबासाहेब गायकवाड, प्रा सुधीर पोतदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख, दीपक राठोड, अॅड. मंजुषा हजारे, जयराज कसबे, शाहूराज कांबळे, नगरसेवक अंगद कांबळे, डॉ. श्रीमंत क्षीरसागर, दिलीप कसबे, ॲड शहानवाज पटेल, राजेंद्र बनसोडे, मुजम्मिल शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी लातूर ब्लड बँकेचे डॉ. नयन पाटील व त्यांचे सहकारी तसेच फ्रेंड्स क्लब औसाचे पदाधिकारी व अन्य तरुण कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.