लातुर रेल्वे स्टेशनला,व लातुरच्या उपविद्यापिठाला पूर्ण विद्यापिठाचा दर्जा देऊन सं.विलासराव देशमुख विद्यापिठ लातुर यांचे नाव द्यावे: विलासराव देशमुख युवा मंचची मागणी
औसा मुख्तार मणियार
देशाचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यांची आज दि.14 आगस्ट रोजी 9 वी पुण्यतिथी असून आज त्यांनी त्यांच्या हयातीत देशासाठी राज्यासाठी व लातूर जिल्ह्यासाठी जी सेवा दिली आहे,ती कधी न विसरता येणारी आहे.त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक विकास कामे केली.त्याचा एक विभाग म्हणून लातुर जिल्ह्यातील व परिसरातील लोकांच्या सेवेसाठी लातुरला रेल्वे स्टेशनची मान्यता असून व ते काम पूर्ण करुन लातूर जिल्ह्याला संबंध देशाला जोडण्याचे काम केले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील व परिसरातील विद्यार्थ्यांचा विचार करून लातूला उपविद्यापिठ मंजूर करून ते प्रत्येक्षात उभे केले. तरी आज त्यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांनी केलेल्या कामाचा व भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श घेण्यासाठी लातुर रेल्वे स्टेशनला स्वर्गीय विलासराव देशमुख रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्यात यावे व तसेच लातूरच्या उपविद्यापिठाला पूर्ण विद्यापिठाचा दर्जा देऊन सं.विलासराव देशमुख विद्यपिठ लातूर असे नामकरण करण्यास मान्यता देऊन आज रोजी त्यांना खरी श्रद्धांजली द्यावी.अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंच औसा शहरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना औसा तहसिलदार मार्फत 14 आगस्ट रोजी निवेदन सादर केले.यावेळी या निवेदनावर विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला, अॅड सचीन मिटकरी, दिपक कांबळे,प्रविण चव्हाण,हाशमोद्दीन शेख,नियामत लोहारे, प्रसाद फुटाणे, नितीन शिंदे, सिकंदर शेख,शहबाज शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.