बोरगाव नकुलेश्वर येथे महिला शेतीशाळा जोरात.
औसा रिपोर्टर
........... आत्मा कृषी विभाग यंत्रणा अंतर्गत नकुलेश्वर बोरगाव येथे महिलांची शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी महिलांना सोयाबीन पिकावरील वेगवेगळ्या किडी व रोगास संदर्भात माहिती देण्यात आली तसेच सोयाबीनचे शास्त्रीय व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याबद्दलचे मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री. कंदले ये. पी. यांनी केले.यावेळी आत्माचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक श्री. गायकवाड व्ही.पी.यांनीही महिलांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. ही शेती शाळा सुधाकर डामगिरे यांच्या शेतात भरविण्यात आली होती.विविध महिला बचत गटाच्या महिला सदस्य कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.यामध्ये श्री गणेश महिला बचत गट, सावली महिला बचत गट, समर्थ महिला बचत गट, यांचा समावेश होता.बचत गटाच्या अध्यक्ष भागीरथी डामगिरी, राधा उतकेकर, सविता थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पिकाच्या संदर्भात विविध प्रश्न विचारून त्यांनी शंकांचे निरसन करून घेतले.व कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग कशा पद्धतीने वाढवता येईल व आत्मा योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध बाबी कशा राबवता येतील या संदर्भात त्यांनी चर्चा केली.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.