औशात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 औशात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी













औसा प्रतिनिधी

औसा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती दि.1 आगस्ट रविवारी सकाळी साडे दहा वाजता औसा शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील समाज मंदिर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.व या जयंती निमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सचीन रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या जंयती प्रसंगी विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी या जयंती निमित्त शकील शेख, दत्तोपंत सूर्यवंशी, सुधीर पोतदार,आदम पठाण, फैय्याज पटेल,खुंदमीर मुल्ला, बजरंग बाजुळगे, राजेंद्र बनसोडे,अंगद कांबळे, जयराज कसबे,मंजुषा कसबे, कल्पनाताई डांगे, सुभाष जाधव,लहु कांबळे,दत्ता पुंड नागनाथ कांबळे, श्रीमंत क्षीरसागर, नंदकुमार सरवदे आदिची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या