उस्मानाबाद आगारचा गलथान कारभारा; बॅलन्स नाही म्हणून एस टी बस टोल नाक्यावरून परत*

 *उस्मानाबाद आगारचा गलथान कारभारा; बॅलन्स नाही म्हणून एस टी बस टोल नाक्यावरून परत*







दि. 24 - उस्मानाबाद -


उस्मानाबाद आगार हा आपल्या गलथान कारभारामुळे आधीच प्रसिद्ध आहे . गाड्या नादुरुस्त असणे , गाड्या वेळेवर न सुटणे , डिझेल उपलब्ध नसणे , इत्यादी तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत . आज त्यात आणखी भर पडली . आज दिनांक १८ बुधवार रोजी सकाळी ८.३० ला सुटणारी उस्मानाबाद ते सोलापूर गाडी क्र MH - २० BL ४२७ ९ हि बस तामलवाडी टोल नाक्यावरून fastag मध्ये बॅलन्स नसल्यामुळे पुढे जाऊ शकली नाही , सादर बस टोल नाक्यावर रोखून धरण्यात अली . तिथे बसमधील प्रवाश्याना गाडीतून उतरवून दुसऱ्या गाडीत बसवून देण्यात आले . परिणामी बसमधील महिला व वृद्ध प्रवाश्याना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला . ऑफिस टाइम ला जाणारी गाडी असल्यामुळे गाडी पूर्ण भरलेली होती परंतु महामंडळाच्या गलथान कारभारामुळे कार्यालयीन कामकाजासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंबा झाला . एकीकडे प्रवाशी कमी असल्यामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे , त्यात असल्या गलथानपणामुळे एस टी वरचा उरला सुरला विश्वास सुद्धा कमी होऊ शकतो . आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष घालून एस टी ची उरली सुरली लाज राखावी अशी प्रवाश्यांकडून मागणी होत आहे .



*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या