लोकरत्न च्या वर्धापन दिनानिमित्त नदीम सय्यद यांचा सन्मान

 लोकरत्न च्या वर्धापन दिनानिमित्त  नदीम सय्यद यांचा सन्मान 










औसा प्रतिनिधी

 दैनिक लोकरत्न च्या वर्धापन दिनाच्या शाही सोहळ्यामध्ये दैनिक लोकरत्नचे संपादक जावेद खान यांनी औरंगाबाद येथे दैनिक लोकरत्नचे उपसंपादक पदी म्हणून नदीम खादर सय्यद औसा यांची  अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निवड करुन सत्कार करण्यात आले.व त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी सन्मानित करुन प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  नदीम सय्यद यांनी मागील वर्षभरामध्ये समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लेखन केले तसेच उपेक्षितांना आपल्या बातम्या च्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्न मांडून प्रशासनाला जागे करण्याचे कार्य केल्याबद्दल नदिम सय्यद यांचा वर्धापन दिनानिमित्त प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मान करण्यात आला.यावेळीअनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या