श्रेय कोणीही घ्या पण उर्दू घर तातडीने करा:एम आय एम पक्षाची मागणी

 श्रेय कोणीही घ्या पण उर्दू घर तातडीने करा:एम आय एम पक्षाची मागणी








औसा प्रतिनिधी 

आज एम आय एम पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष Dr अफसर शेख यांना एक पत्र देण्यात आलेला आहे.मागील 5 वर्षांपासून एम आय एम पक्षाची उर्दू घर व अल्पसंख्याक बहुल ची मागणी होती.आणि त्या संदर्भामध्ये सदर कॉन्सिलने मुख्याधिकारी यांनी अल्पसंख्याक मंत्रालयाकडे यांचा पाठपुरावा करून अल्पसंख्याक निधी म्हणून उर्दू घर करण्याचे निर्णय घेतला होता.तो तातडीने करण्याचा कामही नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू होता.पण 23 आगस्टला अचानक एक पत्र नगराध्यक्ष यांनी सोशल मीडिया वर टाकला आहे.तो उर्दू घर रद्द करण्यात येतो आणि त्याचा निधी दुसरीकडे कुठे तरी खर्च करण्यात त्यांनी निर्धार केलेला आहे.तरीआम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना एक विनंती करत आहोत,मागिल ब-याच वर्षांपासून एम आय एम पक्षाची असलेली मागणी मंजूर झालेली आहे.आणि तो निधी अल्पसंख्याक समाजाच्या नावासाठी आलेला निधी जासाठी निधी आलेला आहे त्यासाठीच खर्च करण्यात यावा.आणि उर्दू घर त्याठिकाणी बनवून उर्दू प्रेमींना प्रोत्साहन देण्यात यावे,व इतर ठिकाणी निधी खर्च न करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.त्यासोबत एक माहितीस्तव महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री,लातर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक पत्र पाठविण्यात येणार आहे.

सदरचा विषय असा आहे की औसा शहरात लोकं आम्ही केलो,आम्ही केलो जो कोणी म्हणत आहेत असे कुणीही करा, श्रेय कोणीही घ्या पण उर्दू प्रेमींना उर्दू घर करणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आली आहे.जर हे उर्दू घर नाही झाले तर एम आय एम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका एम आय एम पक्षाने केली आहे .

आम्ही नगराध्यक्षांना , मुख्याधिकारी यांना ,आणि प्रशासनाला विनंती करत आहोत ,की तातडीने उर्दू घर करुन उद्घाटन करण्यात यावे .व 6 महिन्याच्या आत तो उर्दू घर करण्यात यावा .अशी मागणी आज दि.24 आगस्ट 2021 मंगळवार रोजी औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना एका पत्राद्वारे एम आय एम पक्ष औशाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी एम आय एम पक्षाचे नेते अँड गफुरूल्ला हाशमी, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख सलीम आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या