मयत व्यक्तीची आजपर्यंत ओळख पटलेली नाही.तुळजापूर पोलिस ठाणे यांनी ओळख पटविन्यासठी जनतेला आवाहन


मयत व्यक्तीची आजपर्यंत ओळख पटलेली नाही.तुळजापूर पोलिस ठाणे यांनी ओळख पटविन्यासठी जनतेला आवाहन





उस्मानाबाद रिपोर्टर 

मयत व्यक्तीची आजपर्यंत ओळख पटलेली नाही.तुळजापूर पोलिस ठाणे यांनी ओळख पटविन्यासठी जनतेला आवाहन केले आहे* अल्ताफ शेख प्रतिनिधी/     उस्मानाबाद,दि.24 तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीस दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीस पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेंव्हा तो व्यक्ती मयत असल्याबाबत कळविण्यात आले. या मयत व्यक्तीची आजपर्यंत ओळख पटलेली नाही. मयत व्यक्तीचे प्रेत हे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांच्या ताब्यात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवग्रहात राखून ठेवलेले आहे.


मयत पुरुष व्यक्तीचे अंदाजे वय 55 वर्ष, उंची 164 सें.मी., सावळा रंग, सडपातळ बांधा, उभट चेहरा, सरळ नाक, काळ्या आणि पांढऱ्या रंगाची वाढलेली दाढी, छातीवर उजव्या बाजूस तीळ, अंगावरती पांढऱ्या रंगाचा रेषांचा फुल बाह्याचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. मयत व्यक्तीचा उपलब्ध असलेला फोटो सोबत जोडलेला आहे. तरी मयत व्यक्तीबद्दल कोणास माहिती असल्यास 02471-242028, 02472-22700-900, 9823142632, 9421874794 या क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे तुळजापूर पोलिस ठाणे यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या