*MAHATET 2021 परीक्षेचे आयोजन सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधीत करण्यास शासनाची मान्यता
सविस्तर माहिती। *अल्ताफ शेख प्रतिनिधी/उस्मानाबाद*। पुणे : महाराष्ट्र शासनाने MAHATET 2021 परीक्षेचे आयोजन करण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस मान्यता दिली आहे. सदर परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालावधीत होणार होणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम, आगामी काळात शिक्षक भरतीची शक्यता व महत्वाची संदर्भ पुस्तके पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40 हजार पदे रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात TET परीक्षा झाल्यानंतर TAIT परीक्षा घेऊन सदर पदे भरली जाऊ शकतात, याबाबत शिक्षक पदवी प्राप्त उमेदवारांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.शिक्षण विभाग या जागा टप्याटप्याने भरणार आहे.
*TARGET MAHA TET 2021 परीक्षा अभ्यासक्रम व तयारी*
*(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
*महत्वाचे संदर्भ पुस्तक*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित (30 गुण)*
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
नितीन महाले/शांताराम अहिरे/ सतीश वसे
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/प्रा.अनिल कोलते/विनायक घायाळ
*घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ*
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (तिसरी आवृत्ती)
*परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक*
TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. 2013 ते 2019 पर्यंत TET परीक्षा 6 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 6 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.
*प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक*
TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2019 च्या मागील 6
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.