मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळ चे कर्ज़ वाटप करा एम आई एम ची मागणी
औसा (रिपोर्टर )
एम. आय. एम. व जनतेच्या वतीने निवेदन करण्यात येते की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा मागील 8 आठ वर्षापासुन शैक्षणिक व व्यवसायक किंवा कोणतेही कर्ज वाटप करण्यात आलेले नाही त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाची शैक्षणिक व व्यवसायीक नुकसान होत आहे. वास्तविक सदरचे महामंडळ हे अल्पसंख्यांक समाजाचे उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले आहे.तरी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक व व्यवसायीक कर्ज वाटप करण्याबाबत आपल्या स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे व प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावे जेणे करून नागरीकांना सोईचे होईल.तसेच औसा शहरात अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे मागील बरेच वर्षापासुन औसा शहर अल्पसंख्यांक शहर म्हणून प्रस्ताव आहे. व अल्पसंख्यांक समाजाच्या बरचेशे योजना त्यामुळे रखडलेली आहे. मागील 2016 पासुन एकही रुपये निधी न.प. ला देण्यात आलेला नाही. तो निधी तातडीने देण्यात यावा ही विनंती. तसेच पालिकेने घरपट्टी नळपट्टीत 24 टक्के व्याज दर आकारणी केलेली असून तो जनतेला जाचक असून घरपट्टी नळपट्टीला व्याजदर आकरण्यात आलेला रद्द करण्यात यावा अशी मागणी एम आई एम प्रमुख सय्यद मुज़फ़्फ़र अली ईनामदार यांनी नगर विकास राज्य मंत्री तनपुरे याना निवेदना द्वारे केली आहे ज्या वर अड. रफिक शेख कायदेशीर सल्लागार अॅड. गफरुल्ला हाशमी,. एम आय. एम. नेते, औसा.हारून खान यांच्या स्वाक्षरी आहेत





0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.