*स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाची जबाबदारी
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पार पाडावी*
*शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम क्रिडा संकूल येथे पालकमंत्री अमित देशमुख
यांच्या हस्ते होणार*
लातूर दि.4 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या शासकीय मुख्यध्जारोहण समारंभाची जबादारी सर्व संबंधित अधिकारी वर्गाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रामणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहाात आयोजित मुख्यध्वजारोहण समारंभाची पूर्व तयारी बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. या बैठकीस पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,उपविभागीय अधिकारी सुनिल यादव,निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन गणेश महाडिक,अपर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख,तहसिलदार स्वप्निल पवारसह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशाकीय इमारत,बार्शीरोड येथे सकाळी 8-00 वाजता जिल्हाधिकारी पृथवीराज बी.पी.यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालय जुनी इमारत,शिवाजी चौक येथे सकाळी 8-20 वाजता अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते होणार आहे. तरि जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी वर्गांने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रामणे ध्वजारोहण कार्यक्रम जबाबदारीने पार पाडावा असे त्यांनी निर्देश दिले.
ध्वजारोहण कार्यक्रमस्थळी कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम ठिकाणी सॅनिटायझर मशिन बसविण्यात यावी. या कार्यक्रमासाठी 300 मास्कची व्यवसथा करण्यात यावी असे सूचित केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यकामच्या अनुषंगाने आवश्यकेतनुसार उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवून देण्यात आलेली सर्व कामे सुव्यवस्थाीतपणे पार पाडण्यात यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाच्या शासनाने ठरविलेल्या राष्ट्रीय पोषाख परिधान करून स्वातंत्र्य दिन समारंभ प्रसंगी सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांनी उपस्थित राहावे.
*******
वृत्त क्र.706
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोष 2021 तयार
करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
लातूर दि.4 (जिमाका):- महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रकान्वये शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत करण्यात येणार आहे. या माहितीमध्ये कर्तव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन,मानसेवी तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांची माहिती दिनांक 1 जुलै 2021 या संदर्भ दिनांकास अनुसरून संकलित करण्यात येणार आहे.
राज्यस्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई यांच्यामार्फत विभागीयस्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालय यांच्यामार्फत व जिल्हास्तरावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करते वेळी माहिती नोंदणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या www.mahasdb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर EMDb या नावाने ऑनलाईन संगणकीय आज्ञावली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी लातूर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी लॉगीन यूजर आयडी आणि पासवर्ड तात्काळ प्राप्त करून ऑनलाईन संगणकीय आज्ञावली मध्ये माहिती नोंदणी दिनांक 1 सप्टेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी लातूर यांच्याकडून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना माहिती भरल्या बाबतचे पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2021 च्या वेतन देयके सोबत भरण्यात आलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2022 च्या वेतन देयकासोबत जोडण्यासाठी अदा करण्यात येईल.
संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरील प्रमाणपत्र त्या-त्या महिन्याचे वेतन देयका सोबत जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रमाणपत्राशिवाय सदर महिन्याची वेतन देयके जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष 2021 तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी एल.आर थोंटे तसेच संशोधन सहायक संतोष बोदडे यांनी केले आहे.
****

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.