रेणापूर पंचायत समितीचे २१ कर्मचारी गैरहजर
सभापतींनी केला पंचनामा
कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश
रेणापूर/प्रतिनिधी: बुधवार दि.४ ऑगस्ट रोजी अचानक पाहणी केली असता पंचायत समितीमधील २१ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले.त्याचा पंचनामा करून अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे यांनी दिली.
याबाबत सभापती रमेश सोनवणे यांनी सांगितले की, बुधवारी (दि.४ ऑगस्ट )
रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मी पंचायत समितीमध्ये अचानक भेट दिली.यावेळी कार्यालयात विविध कामांसाठी आलेले नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहत होते.यासंदर्भात माहिती मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्य स्थानावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळले.त्यामुळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी व्ही.जी.बुजुर्गे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.
या पाहणीमध्ये जी.एस. काळे,एन.बी.कुमठेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी के.एम.जाधव,पशुधन अधिकारी के.डी.लिंबाळकर, डीआरडीए विभागातील पवळे व चव्हाण,एन.ए. गायकवाड,एच.डी.सगरे, शाखा अभियंता एस.जी. कुलकर्णी,एस.के.सोमवंशी, एस.एम.राठोड,एस.एम. जटाळ,आढळकर,तालुका आरोग्य अधिकारी देशमुख, शृंगारे,डमाळे,एस.एस.नरहरे, येलाले,जाधव,शेख व रबशेट्टी हे कर्मचारी गैरहजर
असल्याचे निदर्शनास आले.
कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा पंचनामा करून या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत,असेही सभापती रमेश सोनवणे यांनी सांगितले.



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.