रोटरी क्लब लातूर सेंट्रल रोटरी डिस्ट्रिक्ट अवॉर्डस ने सन्मानित

 

रोटरी क्लब लातूर सेंट्रल


रोटरी डिस्ट्रिक्ट अवॉर्डस ने सन्मानित.











लातूर/प्रतिनिधी ः- संपुर्ण जगात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी परिवार अंतर्गत काम करणार्‍या वेगवेगळ्या संघटनांना आपआपल्या संघटनेचे सदस्य अधिक वाढविण्याकरीता रोटरी परिवार सातत्याने प्रोत्साहन देत असते. त्याचबरोबर जी संघटना सर्वाधिक सभासद नोंदणी करेल त्यांना बक्षीसही देण्यात येते. त्याअनुषंगानेच लातूरच्या रोटरी क्लब लातूर सेंट्रलने सर्वाधिक नोंदणी केल्याबद्दल मेंबरशिप डेव्हलपमेंटचे प्लॅटिनम अवॉर्ड क्लबचे  मेंबरशीप डायरेक्टर रो. शैलेश गुडे व अध्यक्ष अ‍ॅड. नंदकिशोर लोया व सचिव पुरुषोत्तम नोगजा यांना कोरोणा परस्थितीत उल्लेखनीय सेवा कार्य बद्दल अवॉर्ड  देण्यात आले आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने आयोजित प्रतीक सन्मान सोहळा अहमदनगर येथे संपन्न झाला.
सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाला दिशा देण्याकरीता रोटरी परिवार संपुर्ण जगात कार्यरत आहे. 
रोटरी परिवाराच्या वतीने भारतातही मोठे कार्य होत असून या परिवाराच्या वतीने सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित गरजवंताना मदतीचा हात देण्यात येतो. रोटरी परिवाराच्या सहा वेगवेगळ्या संघटना कार्यरत असून लातूर जिल्ह्यात सुद्धा या संघटनांचे मोठे कार्य आहे. या संघटनेसोबत अधिकाधिक सदस्य जोडले जाण्यासाठी रोटरी परिवार दरवर्षी सदस्य नोंदणी (मेंबरशिप डेव्हलपमेंट), रक्तदान शिबिर अभियान, शैक्षणिक प्रकल्प , आरोग्य शिबीर , पाणी पुनर्भरण , अन्नसेवा प्रकल्प , शिलाई मशिन वाटप प्रकल्प असे विविध अभियान राबवित असते. लातूर जिल्ह्यात हे अभियान उत्स्फुर्तपणे राबविण्यात आले आहे. या अभियानाकरिता रोटरीच्या सहाही संघटनांनी मोठी मेहनत घेऊन आपली सदस्य संख्या वाढविलेली आहे. विशेष म्हणजे सदस्य संख्या वाढण्यासाठी रोटरी परिवाराच्या वतीने प्रोत्साहन म्हणून पारितोषकही देण्यात येते. त्याअनुषंगाने लातूर येथील रोटरी क्लब लातूर सेंट्रलने सर्वाधिक चांगले काम करून सदस्य नोंदणी केलेली आहे.
रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या या कामाची दखल घेत रोटरी परिवाराच्या वतीने रोटरी क्लब लातूर सेंट्रलचा गौरव केलेला आहे. मेंबरशिप डेव्हलपमेंटमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अध्यक्ष अ‍ॅड. नंदकिशोर लोया व सचिव पुरुषोत्तम नोगजा, रो.राजगोपाल मुंदडा , रो.डॉ.संजय वारद , रो.गिरीश ब्याळे , रो.पुरुषोत्तम सोनी, रो. किरण देशमाने , रो. हेमंत रामढवे, रो. महेश औरादे  यांचा सत्कार करून विविध अवॉर्ड   देण्यात आले.  विशेष म्हणजे रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या अद्यापर्यंतच्या कार्याच्या इतिहासात प्रथमच हे अवॉर्ड  मिळाल्याबद्दल अध्यक्ष अ‍ॅड. नंदकिशोर लोया व सचिव पुरुषोत्तम नोगजा यांच्यासह  क्लबच्या पदाधिकार्‍यां चे रोटरी परिवारासह अनेकजणांकडून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या