*स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह अटक,10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यात घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
काही दिवसापूर्वी रेनापुर येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल चोरीचा प्रकार घडला होता. त्यावरून पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 355/2021, कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलीस अधीक्षकांचे आदेशान्वये गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार करीत होते. दरम्यान सदर तपास पथकाला माहिती मिळाली की, रेणापूर येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुरुड येथे ट्रक क्रमांक एम. एच.44-7787 मध्ये बसून येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर तपास पथकाने सबस्टेशन मुरुड येथे सापळा लावला.काही वेळातच माहिती प्रमाणे एक ट्रक समोरून येताना दिसला. सदर ट्रकला हात करून थांबून ट्रक चालकास विश्वासात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने आपले नाव राजेंद्र काळे, वय 21 वर्ष, राहणार-आंदोरा तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद ह.मु. कनेरवाडी, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असल्याचे सांगितले तसेच रेनापुर येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या त्याच्या ताब्यातील ट्रक व अजून एक ट्रक वापरून इतर साथीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.त्या गुन्ह्यात चोरलेले डिझेल याच ट्रक मध्ये पाठीमागे प्लास्टिकच्या कॅन मध्ये भरून ठेवलेले आहे असे सांगितले.
त्यावरून सदर आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ट्रक व 385 लिटर डिझेल असा एकूण 10 लाख 36 हजार 960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि सुधीर सूर्यवंशी पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे,अंगद कोतवाड,राम गवारे, प्रकाश भोसले, राम हरी भोसले,राजू मस्के,नवनाथ हसबे,नितीन कठारे,चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे यांचा सहभाग होता.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.