राजकारणातील मैत्रीभावामुळे लोकशाही मजबूत
ॲड.एस.एस. पाटील मूर्ती अनावरण कार्यक्रमात चाकूरकरांचे प्रतिपादन
आलमला / प्रतिनिधी
राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मैत्रीचा अभाव असला की लोकशाही कमकुवत होते, असे सांगून सत्ताधारी व विरोधक जेव्हा मैत्रीभाव ठेवून काम करतात, तेव्हा लोकशाही दृढ, मजबूत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमचे सहकारी ॲड. एस.एस. पाटील यांनी सर्वांशी मैत्रीभाव ठेवत लोकशाहीचा विचार जोपासला, असे प्रतिपादन माजी केंद्गीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
ॲड. एस. एस. पाटील (बाबा) यांच्या प्रथम स्मृतीदिनी औसा तालुक्यातील आलमला येथे मंगळवारी (दि.१७) समाधीस्थळी ॲड. एस. एस. पाटील यांच्या मूर्ती अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर औसा हिरेमठाचे निरंजन शिवाचार्य महाराज, ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड. मनोहरराव गोमारे, शैलेश पाटील चाकूरकर, सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, औसा पं.स. सभापती सौ. अर्चनाताई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवराज पाटील चाकूरकर पुढे म्हणाले की, ॲड.एस.एस. पाटील हे आमचे सुरुवातीपासून सहकारी राहिले. वकिली व्यवसायात त्यांनी आपले काम प्रामाणिक व निष्ठेने केले. आपल्यापेक्षा चार वर्षांनी या व्यवसायात कनिष्ठ असले तरी त्यांना कामाबाबत कधीही मार्गदर्शन करावे लागले नाही, इतका व्यवस्थितपणा त्यांच्या कामात होता. सिध्देश्वर सहकारी बँकेच्या स्थापनेपासून ते बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी काम केले. आजच्या परिस्थितीत अनेक संस्थांमध्ये पदांसाठी वाद-विवाद होत असलेले पाहत असताना ॲड. एस. एस. पाटील यांनी मात्र पदाची अपेक्षा न ठेवता संस्था अधिकाधिक कशी मजबूत होईल, यादृष्टीने सर्वांना सोबत घेऊन काम केले. श्री रामनाथ शिक्षण संस्थेची स्थापना करुन ग्रामीण भागात शिक्षणाचा विचार रुजविला. राजकारणात काम करताना अगदी विरोधी पक्षातील लोकांशीही त्यांनी मैत्रीभाव कायम ठेवला. आमच्यासोबत निष्ठेने काम केले, मात्र त्यांनी आपल्याकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. ॲड. एस. एस. पाटील यांचा विचार आज या कार्यक्रमास असलेल्या उपस्थितांमध्ये आहे, तो कायम ठेवल्यास खऱ्या अर्थाने त्यांना श्रध्दांजली ठरेल, असे मतही चाकूरकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पाटील परिवार, आलमला ग्रामस्थ व आजू-बाजूच्या गावचे ॲड. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो, असेही चाकूरकर यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना ॲड. मनोहरराव गोमारे यांनी ॲड. एस. एस. पाटील यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला. शिक्षण संस्था, सिध्देश्वर सहकारी बँक, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच राजकारण करतानाही ॲड. पाटील यांनी माणूस उभा करण्याचे, घडविण्याचे कार्य केले. कार्यक्रमाला असलेल्या संख्येवरुनच त्यांच्या मैत्रीची प्रचिती येते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाधीस्थळी ॲड. एस. एस. पाटील यांच्या मूर्तीचे अनावरण शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रभाकर कापसे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत ॲड. उमेश एस. पाटील, राजेश पाटील, ॲड. महेश पाटील, विश्वनाथ बिराजदार, सरपंच कैलास निलंगेकर, शिवाजी अंबुलगे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करुन रामनाथ विद्यालयाचे सहशिक्षक पी.सी. पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्गकांत बिराजदार, माजी महापौर सुरेश पवार, शेषेराव पाटील, रामदास चव्हाण, बालाजी कांबळे, व्यंकटराव पाटील, ॲड. गुरुनाथप्पा ब्याळे, ॲड. पत्रिके, राजेश्वर बुके, विठ्ठलराव माकणे, नगरसेवक रविशंकर जाधव, ॲड. श्रीकांत उटगे, बसवराज उटगे, स्थायी समिती सभापती दीपक मठपती, अशोक गोविंदपूरकर, ॲड. अण्णाराव पाटील, पंडितराव धुमाळ, शिवसेनेचे निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, प्रा. एम. व्ही. मलशेट्टे, प्रा. बी.एम. पाटील, सिद्गामप्पा मिटकरी, हनमंत राचट्टे, डॉ. रुद्गप्पा धाराशिवे, ॲड. मन्मथप्पा राचट्टे, विजयकुमार मिटकरी, ॲड. धुळाप्पा रविशेट्टे, सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष शिवकुमार पाटील रायवाडीकर व सर्व संचालक, प्राचार्य प्रशांत धाराशिवे व विश्वेश्वर शिक्षण संस्थेतील प्राध्यापकवृंद, श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जी.एम. धाराशिवे व सर्व संचालक, प्राचार्या सौ. अनिता पाटील व श्री रामनाथ विद्यालयाचे सर्व कर्मचारी, सरपंच कैलास निलंगेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार व सर्व संचालक, औसा तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्री रामनाथ शिक्षण संस्था व श्री रामनाथ मा. व उच्च मा. विद्यालय, लातूरचे जनपथ विद्यालय, देवीलक्ष्मी अर्बन निधी लि. लातूर, माय अप्लायंसेस वर्ल्ड, लातूर, शिव-मुक्ती ट्रेडर्स, लातूर, तावरजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आलमला, देविका अवाकुल, आलमला यांच्यासह आलमला ग्रामपंचायत, आलमला विकासे सहकारी सोसायटी व आलमला ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
...........फोटो................






















0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.