**रामनाथ विद्यालयात दहावी-बारावीच्या गुणवंताचा सत्कार समारंभ संपन्न**
आलमला श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे 24 ऑगस्ट 2021 रोजी विद्यालयात एप्रिल 2021 मध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ज्यांनी विशेष गुण प्राप्त केली आहे अशा मुलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य प्रशांत धाराशिवे, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निकल कॉलेज अलमला हे होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पुष्पहार ग्रंथ देऊन त्यानंतर दहावीचे अकरा विद्यार्थी विशेष उत्तीर्ण झाले म्हणून व एमसीवीसी शाखेच्या तीन विभागातील दोन दोन विद्यार्थ्यांचा व कला शाखेतील दोन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांनी मुलांना सखोल मार्गदर्शन केले व होतकरू गरीब विद्यार्थ्यांना विश्वेश्वरया शिक्षण संस्थेत मोफत प्रवेश दिले जातील असे अभिवचन दिले सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोप करतेवेळी संस्थेचे अध्यक्ष अडवोकेट उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी रामनाथ शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आली तर ते सोडवण्यासाठी संस्था सदैव आपल्या सोबत आहे. आपण फक्त गुणवत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहावे व आपले आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावे असे आव्हान केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सोपान काका अलमलेकर सहसचिव प्रभाकर कापसे संस्थेचे संचालक मनमत आप्पा धाराशिव हे कैलास कापसे केदार निलंगेकर शंकर धाराशिवे, सौ.प्राचार्य अनिता पाटील पर्यवेक्षक आवटे ए आय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यवंशी बी वाय सहशिक्षक यांनी मांडले कार्यक्रमास दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक विद्यालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.