सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी मार्गदर्शन
लातूर/प्रतिनिधी:द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी
मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य तथा एमएसएमई समितीचे अध्यक्ष सीए धीरजकुमार खंडेलवाल यांची उपस्थिती लाभणार आहे.आयसीएआय ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए एस.बी. असावा हे देखील प्रोजेक्ट फायनान्स फॉर एमएसएमई या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
बुधवार दि.२५ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दयाराम रोड शाखा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमानंतर लातूर जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी व व्यापारी प्रतिनिधींसोबत उद्योगांशी निगडित सबसिडी, व सबसिडीचे लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणी या विषयावर संवाद साधला जाणार आहे.
लातूर शहर व परिसरातील सर्व सीएंनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष सीए विशाल चव्हाण,उपाध्यक्ष द्वारकादास भुतडा,सचिव विनोद साळुंके,राजेश अग्रवाल,किशोर भराडिया यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.