काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ऊषा कांबळे भडीकर यांचे दु:खद निधन धक्कादायक पालकमंत्री अमित देशमुख

 

काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ऊषा कांबळे भडीकर

यांचे दु:खद निधन धक्कादायक

पालकमंत्री अमित देशमुख








लातूर प्रतिनिधी (सोमवार दि. २३ ऑगस्ट २१)

  लातूर शहर महानगरपालीकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ऊषा भाऊसाहेब कांबळे भडीकर यांचे कोरोना१९ प्रादूर्भावामुळे उपचार सुरू असतांना सोलापूर येथील रूग्णालयात दु:खद निधन झाले आहे. त्यांचे निधन त्यांच्या कुटूंबाप्रमाणेच काँग्रेस पक्षासाठी दुदैवी आणि धक्कादायक आहे, त्यांच्या कुटूंबियाच्या दु:खात आपण सहभागी आहोत, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.

 काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ऊषा कांबळे भडीकर या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. लातूर शहर महानगरपालीकेत त्या चांगले काम करीत होत्या. गेल्या काही महिन्यापासून  कोरोना आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर मात करून त्या लवकरच लोकसेवेत सक्रीय होतील अशी सर्वांची अपेक्षा होती. दुदैवाने कोरोना सोबतची त्यांची झुंज अयशस्वी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबावर कोसळलेल्या दु:खात मी सहभागी असून या दु:खातून सावरण्यासाठी सदभावना व्यक्त करतो, आहे असेही पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या