रोटरी क्लबच्या वतीने जेष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कार्यशाळा.
लातूर/प्रतिनिधी:जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाउन व यश सेल्स - कॅनन ब्रँड स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जेष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी कार्यकाळाही घेण्यात आली.
व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश कडेल,सचिव अनिल टाकळकर, कार्यक्रमाचे सहप्रायोजक नितीन डोईजोडे,प्रकल्प प्रमुख भीमाशंकर राघो, रोट्रॅक्ट अध्यक्ष प्रसाद वारद, मंगेश राघो,मित दामा यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मोहन सोनवणे,पोलीस विभागात कार्यरत असलेले व फोटोग्राफीचा छंद जोपासून विविध पारितोषिके मिळवलेले धनंजय गुट्टे, कॅननचे चीफ ऑफिसर राजकुमार पिल्ले,कॅननचे प्रतिनिधी व कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक दिपक गोरडे, रोटरीचे सदस्य व फोटोग्राफी व्यवसायात असलेले नितीन डोईजोडे व भीमाशंकर राघो यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना धनंजय गुट्टे यांनी छायाचित्रण हा एक फक्त छंद नसून ते एक उत्तम करिअर होऊ शकते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सतीश कडेल,संचलन प्रा.चंद्रप्रभू जंगमे व प्रा.
विशाल अयाचित तर आभार प्रदर्शन भीमाशंकर राघो यांनी केले.
दुसऱ्या सत्रात छायाचित्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यात दिपक गोरडे यांनी बेसिक फोटोग्राफी,कॅमेऱ्याची ओळख,विविध सुट्या भागांची माहिती,कार्य,
विविध मोड याबद्दलची माहिती दिली.विविध उद्देशांनी करावयाची फोटोग्राफी,त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेची प्रस्तावना नितीन डोईजोडे तर आभार प्रदर्शन चंद्रप्रभू जंगमे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल आयाचित,चंद्रप्रभू जंगमे,डॉ. किरण दंडे,डॉ श्रीनिवास भंडे, रवींद्र बनकर,रवी रेड्डी, रोट्रॅक्ट प्रकल्प संयोजक मंगेश राघो,मित दामा, अनिल कुलकर्णी व सर्व रोट्रॅक्ट सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.