आधार प्रतिष्ठान भादा कडून 125 तैवान लाल पेरूचे घरोघरी वृक्ष वाटप -रक्त दात्याच्या संन्मानार्थ उपक्रम

 आधार प्रतिष्ठान भादा कडून 125 तैवान लाल पेरूचे घरोघरी वृक्ष वाटप 

-रक्त दात्याच्या संन्मानार्थ उपक्रम   







औसा-औसा तालुक्यातील भादा येथे नुकतेच आधार प्रतिष्ठान कडून तैवान जातीचे लाल पेरूचे वृक्ष भेट देण्यात आले.

आधार प्रतिष्ठान भादा कडून दि 14 मे 2021 रोजी बसवेश्वर जयंती आणि ईद निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.त्यानिमित्त भादा तालुका औसा येथे भादेकर नागरिक आणि बोरगाव(न)येथील रक्त दात्याकडून असे एकूण 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

 यामुळे त्या रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आधार प्रतिष्ठान कडून तैवान जातीचे लाल पेरूचे वृक्ष लागवड करून भादा येथील नागरिकांना रक्तदान स्मरणात राहील यासाठी हे वृक्ष 150 प्रति एक असे एकूण 125 वृक्ष खरेदी करून ते रक्त दात्यांना घरोघरी जाऊन सोमवार दि 13 सप्टेंबर 2021 रोजी वाटप करण्यात आले.

 भादा हे पूर्वी पेरू साठी प्रसिद्ध गाव होते.

यामुळे हा पेरू पुन्हा जुन्या आणि पूर्वीच्या आठवणी भादे कराना आणि लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आठवण करून देण्यासाठी आधार प्रतिष्ठान कडून हे तैवान जातीचे पेरूचे वृक्ष वाटप करण्यात आले. यामुळे पूर्वी भादा हे गाव पेरूचे भादा म्हणून ओळखले जात होते.ती ओळख पुन्हा काही प्रमाणात निर्माण व्हावी या उद्देशाने सध्या 125 पेरूची रोपे वाटप करण्यात आले.

यावेळी आधार प्रतिष्ठानचे मनोज पाटील,बालाजी उबाळे,प्रशांत पाटील,गोरख बनसोडे,रविशंकर पाटील,शंमशोद्दीन खोजे,रियाज खोजे,लखन लटूरे, सुनील राऊत सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या