न्यायासाठी लढणाऱ्यांना अखेर मिळणार न्याय...
जिल्हाधिकारी यांचे न.प. मुख्याधिकारी औसा यांना
विभागीय चौकशीचे आदेश...
औसा (प्रतिनिधी):-विशेष वृत्तानुसार औसा नगर परिषदेतील नामांतर विभागामधील कांही झारेतील शुक्राचार्य कर्मचारी श्रीराम ताकभाते व तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी औसा येथील बनावट सिटी सर्वे आधारे अनेक शासकीय व न.प.च्या जागावर कांही पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, आजी,माजी नगरसेविका पती व समाजकंटक लोकांच्या नावे अतिक्रमण करून देऊन चक्क त्यांना मालकी बहाल करून ८अ तयार करून दिल्याचा धक्कादायक प्रकार औसा शहरात घडला होता.औसा न.प.च्या हद्दीतील जमीन सर्वे नं.३ ब भीम नगर मधील वडीलोपार्जीत मालक समद बाशीद शेख यांच्या २ गुंठे जागेपैकी काही जागेवर बोगस सिटी सर्वे भूमापन क्रमांक १६७४ च्या आधारे शरद देविदास बनसोडे, यांच्या नावावर न.प.च्या रेकॉर्डला मालकी दाखवून ८अ तयार करून दिले आहे. त्या बनावट ८अ आधारे बनसोडे यांनी न.प.च्या नसलेल्या मोकळ्या जागेत पत्र्याचा शेड अतिक्रमण केले आहे अशी तक्रार समद बाशीदसाब शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. २४.६.२०२१ रोजी लेखी तक्रार केली होती की, शरद देविदास बनसोडे व नगरपरिषद नामांतर विभाग प्रमुख श्रीराम ताकभाते आणि तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी संगनमत करून माझ्या सर्वे नंबर ३ ब येथील जागेवर बनावट सिटी सर्वे १६७४ च्या आधारे ८/अ तयार करून शासनाची व माझी फसवणूक करून रमाई घरकुल चा लाभ घेत आहेत व मला मानसिक त्रास देत आहेत. याची तक्रार मा.जिल्हाधिकारी यांना केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक - ०६/०९/२०२१ रोजी लातूर जिल्हाधिकारी बी.पी.प्रथ्वीराज यांनी अर्जदार समद बाशीदसाद शेख यांची याचीका मंजूर करून घेत त्यामध्ये ४ तारखा ठेवण्यात आल्या होत्या . जिल्हाधिकारी लातूर यांचेकडे दिनांक २४/०६/२०२१ रोजी अपील दाखल केली होती. सदरच्या अपीलामध्ये मा.जिल्हाधिकारी लातूर यानी गांभीर्याने दखल घेवुन प्रकरण सुनावणीसाठी ठेवले असता याचिकाकर्ता तर्फे श्री ॲड.एफ.पी. सय्यद यानी युक्तीवाद करुन बनावट कागदपत्राआधारे दुष्टबुध्दीने नियोजीत केलेले कार्य व नाव नोंदणीच्या आदेशामध्ये असलेल्या त्रुटी आणि शासनाचा बुडविलेला महसुल याकडे मा.जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिले त्याअनुषंगाने मा जिल्हाधिकारी यांनी सदरचा युक्तिवाद ग्रहीत धरुन ऑन रेकार्डवर दाखल केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे अर्जदाराचा अर्ज मंजुर करुन नगर परिषद औसा येथील नामांतर विभाग प्रमुख श्रीराम ताकभाते, लिपीक लक्ष्मण चोपडे, शिपाई अजय बनसोडे व तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे कर्मचारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) अधिनियम १९७९ च्या नियम ०३ चा भंग केल्याचा निष्कर्ष काढुन मा. मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांना वरील लोकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर ८ अ उताऱ्यावरून शरद बनसोडे याचे नाव कमी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही बाबतचा अहवाल जिल्हा प्रशासन अधिकारी मार्फत नगर विकास विभागास पाठवण्याचे आदेशीत केले आहे.सदरच्या आदेशामुळे नगर परिषद औसा येथे मोठी खळबळ उडाली असून अजुन बरेचसे प्रकरणे हे सिटी सर्वे च्या बोगस कागदपत्राआधारे नोंदणी करुन औसा नगर परिषदच्या मालमत्ता रेकॉर्डवर शासकीय व निमशासकीय जागेवर मालकी हक्क देवून जागेंचे ८ अ तयार करुन संगणमत करुन शासनाची फसवणुक केल्याचे दिसुन येत आहे व शहरातील इतर सिटी सर्वे आधारे झालेल्या नाव नोंदणीची चौकशीपण मा.मुख्याधिकारी यांनी करावी जेणेकरुन यावरुन असे अजुन किती बोगस प्रकरण उघडतील असे जनतेतुन बोलले जात आहे.
त्यामुळे आगामी काळात मुख्याधिकारी औसा किती निःपक्षपाती चौकशीला सामोरे जातील व लवकरात लवकर अहवाल सादर करतील हे पाहणे तितकेच महत्त्वाचे राहील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.