महावितरणचा भोंगळ कारभार,महालक्ष्मी दिवशी औसा शहरात अंधाराचे साम्राज्य !

 महावितरणचा भोंगळ कारभार,महालक्ष्मी दिवशी औसा शहरात अंधाराचे साम्राज्य !



औसा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या औसा विभागाचा भोंगळ कारभार सुरू असून शहरांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज ग्राहकांना वीज बिले भरण्यासाठी सकती केली जाते, परंतु विद्युत ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे कर्तव्य मात्र महावितरण जाणीवपूर्वक विसरत आहे. औसा तालुक्यामध्ये आणि शहरांमध्ये महावितरणच्या अनेक समस्या आहेत. तुटलेल्या तारा, वाकलेले पोल, रोहित्राची दुरावस्था तसेच अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या औसा तालुक्यातील महावितरणला विद्युत ग्राहकांना सुरळीत विद्युतपुरवठा करता येत नसल्याने महावितरणचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. महालक्ष्मीच्या दिवशी महत्त्वाचा सण असताना सायंकाळी सात वाजल्यापासून विद्युत पुरवठा बंद झाल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. येथील समता नगर भागात विद्युत तारा तुटल्याचे सांगण्यात येते. महावितरणचे उपविभागीय अभियंता, शहर अभियंता व इतर कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोनवर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिक, सुवासिनी महिला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मागील काही दिवसांपूर्वी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठका घेऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही. आढावा बैठका हा केवळ फार्स समजला जातो. लोकप्रतिनिधीने आढावा बैठका घेऊन सुद्धा वीज ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही त्यामुळे या बैठका घेऊन तरी उपयोग काय ? अशीही चर्चा शहरांमध्ये ऐकण्यास येत आहे. वास्तविक पाहता महावितरण कंपनीने पावसाळ्याच्या पूर्वी दक्षता घेऊन वादळ वारे आणि पाऊस येईल म्हणून तालुक्यातील सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खबरदारी घ्यायला पाहिजे होती परंतु जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार ऐनं महालक्ष्मीच्या सणा दिवशी अवश्य करांना पाहायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या