चाकूचा धाक दाखवून सोनचिंचोली येथे सत्तर चांदीचे नाणी दिड तोळे सोने वीस हजार रोख चोरी करुन चोर फरार

 चाकूचा धाक दाखवून सोनचिंचोली येथे सत्तर चांदीचे नाणी दिड तोळे सोने वीस हजार रोख चोरी करुन चोर फरार




औसा प्रतिनिधी विलास तपासे /मुख़्तार मणियार 

बेलकुंड पासूपासून 3किलोमीटर अंतरावर सोनचिंचोली हे गाव आहे सोनचिंचोली गावातील साहेबराव धोंडीराम चव्हाण यांच्या घराच्या पाठिमागच्या दारावरून घरामध्ये प्रवेश करुन दोन दारांना कडी लावून दोन घरामधे प्रवेश केला एका घरात आजी राहत होती. एका घरात त्यांची सून राहत होती. सूनेला चाकूचा धाक दाखवून चाव्याची मागणी केली व 70 वर्षीय आजीची पेटी घेऊन चोर फरार झाले त्या पेटीमध्ये जुन्या प्रकारच्या चांदीचे 70 नाणी होते दिड तोळे सोने होते 20,000 रूपये रोख होते 10-11 साड्या होत्या आजीची पेटी चोर घेउन पळाल्यामुळे सर्वत्र चर्चा झाली गेल्या 10-12 दिवसापासून बेलकुंड परिसरात चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे बेलकुंड गावात चोरी झाली म्हणून गेल्या दोन दिवसांपासून बेलकुंड गावामध्ये पोलीस गाडीची राउंड मारण्यात सुरूवात केली आहे आज तीन वाजता पहाटे बेलकुंड गावात पोलीस गाडी आली होती त्याच टाईमिंग मध्ये सोनचिंचोली येथे चोरी झाली पोलिस गाडी बेलकुंड मध्ये चोर सोनचिंचोली मध्ये असा लपंडाव चोर पोलिसा बरोबर खेळत आहेत आतापर्यंत पोलिसांमध्ये कोणत्याही गुन्ह्याची करण्यात आली नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या