*हासेगाव डी फार्मसी चा १००% निकाल*

 *हासेगाव डी फार्मसी चा १००% निकाल*








  1. दि ३१ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी डी.फार्मसी (डिप्लोमा इन फार्मसी) चा उन्हाळी २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर केला असता औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी, हासेगाव या महाविद्यालयाचा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल १००% आहे एकूण ६८ विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२१ परीक्षा दिली होती त्यापैकी ४२ विद्य्यार्थी प्रथम श्रेणीत तर २६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत विद्यार्थी कु.जाधव देवानंद यांनी ९१.७३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, कु.हुलसूरकर साक्षी यांनी ८९.००% गुण मिळवून द्वीतीय क्रमांक पटकावला आहे तसेच कु.जाधव स्नेहल यांनी ८८.३६% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे कोष्याध्यक्ष श्री.शिवलिंगजी जेवळे तसेच संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.श्यामलीला बावगे (जेवळे) यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी महाविद्यालायातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इ. उपस्थित होते महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत व विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत त्याबद्दल श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकरअप्पा बावगे , संस्थेचे उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे  प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे  लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य श्री.रबीक खान , राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेकनिक च्या प्राचार्या सौ योगिता बावगे , ज्ञानसागर विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक श्री.आनंद शेंडगे, लातूर सायन्स कॉलेज चे  श्री अनंत लांडगे ,लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्राचार्य श्री. सतीश गायकवाड तसेच सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी मान्यवरांनी महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या