गुळखेडा येथील रमाई घरकुलांचे सभापती अर्चना गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मौजे गुळखेडा येथे रमाई घरकुल योजने अंतर्गत सण 2019-2020 मधील 11घरकुले मंजूर झाली असून आज पंचायत समितीच्या सभापती अर्चना गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आला आहे. सर्वप्रथम ग्राम पंचायत च्या वतीने सभापती अर्चना गायकवाड यांचा सरपंच उज्वला चेंडके यांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार केला, त्यानंतर विनोद माने, विश्वास काळे , सय्यद यांचाही सत्कार करण्यात आला.
रमाई आवास योजनेअंतर्गत गुळखेडा ग्राम पंचायत मार्फत पंचायत समिती तर्फे 11लाभार्थी यांना घरकुल मंजूर झाले होते. त्या मंजूर घरकुलांचे आज पंचायत समितीच्या सभापती अर्चना गायकवाड यांच्या हस्ते समाधान दिगंबर कसबे व बालाजी गोरोबा कांबळे या लाभार्थी यांच्या जागेचे कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी औसा पंचायत समिती चे सदस्य विनोद माने,काळे विश्वास,गुळखेडा लोकनियुक्त सरपंच उज्वला बबन चेंडके, ग्रामपंचायत सदस्य भास्कर यादव, ग्रामसेवक बी पाटील, घरकुल तांत्रिक कार्यक्रम अधिकारी सदाम सय्यद, सुधीर भोसले, पप्पू गोरे,चांद शेख,उत्तम भोसले, पत्रकार पांचाळ विठ्ठल, विष्णू भोसले, गोरोबा स्वामी, बालाजी पांचाळ,वैभव भोसले, दादा टिके, बबन पोळकर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.