इतिहास संशोधकाकडून जिल्हा माहिती अधिकारी श्री.सोनटक्के यांचा सत्कार

 इतिहास संशोधकाकडून जिल्हा माहिती अधिकारी श्री.सोनटक्के यांचा सत्कार






लातूर, दि.1(जिमाका) :-   येथील जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयात इतिहास संशोधक यांच्याकडून भेटवस्तु ग्रंथ, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विवेक सौताडेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनानुसार  लातूर जिल्हा पुस्तिका तयार करण्यामध्ये समितीचे सदस्य सचिव या नात्याने सुनिल सोनटक्के यांचा मोलाचा वाटा आहे. वैभवशाली लातूर या पुस्तिकेवर संस्कार साडेआठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले असून महाराष्ट्रात पहिल्यांदा लातूर जिल्ह्याने ही पुस्तिका प्रकाशित करुन नावलौकिक निर्माण करुन एक लातूर पॅटर्न निर्माण केला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, यापुढेही पदोन्नती होवून लातूर येथे आपण याल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ऋणानुबंध कायम राहतील, असेही ते म्हणाले.   

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ होळकुंदे, डॉ. सुनिल पुरी, इतिहास संशोधक विवेक सौताडेकर, लातूर समाचारचे संपादक दयानंद जडे, किरण कुलकर्णी, निलेश शंकाये, विभागीय माहिती कार्यालयाचे श्री. अशोक माळगे, वरिष्ठ लिपीक विवेक डावरे, दिलीप वाठारे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या