जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा 1 ते 7 सप्टेंबर, 2021 या कालावधीत “ मातृ वंदना सप्ताह ”

 जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांनी

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

1 ते 7 सप्टेंबर, 2021 या कालावधीत  मातृ वंदना सप्ताह 









 

लातूर, दि.1(जिमाका):-   संपूर्ण देशामध्ये दिनांक १ सप्टेंबर, 2021 ते दिनांक ७ सप्टेंबर, 2021 या सात दिवसाच्या कालावधीमध्ये मातृ वंदना सप्ताह राबविण्याबाबत शासनाकडून आदेशित केले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत दिनांक १ जानेवारी, 2017 रोजी अथवा तदनंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसुती झली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाच्या अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी पुढीलप्रमाणे देण्यात येतो.

पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकरात लवकर मासिक पाळीच्या शवेटच्या तारखेपासून १५० दिवसात आपल्या जवळील एएनएम / आशा यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर रुपये २ हजार, तिसऱ्या टप्प्यात प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास १४ आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर रुपये ३ हजार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजतनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना एकूण रुपये ५ हजारचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर देण्यात येतो. हा लाभ एकूण तीन टप्प्यात देण्यात येतो. 

लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बॅंक खाते, गरोदर पणाची शासकिय आरोग्य संस्थेत 150 दिवसांचे आत नोंद, शासकिय संस्थेत गरोदरपणा दरम्यान तपासणी, बाळाची जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण.  या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.

सदर सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केद्रे आणि सर्व आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये जनतेत व्यापक प्रमाणात जनजागत्रती करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्हयात 51 हजार 135 इतक्या लाभार्थ्यांना रक्कम रुपये 20.45 कोटी इतक्या रकमेचा लाभ लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर डिबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. तसेच सदरच्या योजनेतून महाराष्ट्र राज्याकडून संपूर्ण राज्यात आतापर्यंत रक्कम रुपये 1 हजार कोटी रुपये अनुदान अदा करण्यात आलेले आहे.

दि. 1 ते 7 सप्टेंबर 21 या कालावधीत होणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताहाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल गोविंदराव केंद्रे, उपाध्यक्षा श्रीमती भरतबाई दगडू सोळंके यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन पार पडले. सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमास समाज कल्याण सभापती रोहिदास अंबादास वाघमारे, कृषी, पशु संवर्धन, दुग्धविकास सभापती गोविंद त्र्यंबकराव चिलकुरे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय सिताराम दोरवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर जी.परगे , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, अति. आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी एस बरफरे, सदर कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक लाडेकर गजानन, जिल्हा आशा समन्वयक श्रीमती संगिता डवरी व जिल्हयातील गट प्रर्वतक व आशा यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या