संपुर्ण कर भरणा करतील अशाच मालमत्‍ताधारकांना शास्‍तीमध्‍ये/व्‍याजामध्‍ये ५०% सुट महापालिका चा निर्णय

 


लातूर शहर महानगरपालिका,हद्दीतील सर्व मालमत्‍ताधारकांना कळविण्‍यात येते की, महाराष्‍ट्र    महानगरपालिका,अधिनियम १९४९ कराधान प्रकरण आठ,नियम ४१ अन्‍वये थकीत कराच्‍या रक्‍कमेस २% प्रमाणे शास्‍ती  लावण्‍याची तरतूद आहे.उक्‍त तरतूदीनुसार लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील विहित मुदतीमध्‍ये  मालमत्‍ताकराचा भरणा न करणा-या मालमत्‍ताधारकावर २% प्रमाणे शास्‍तीची आकारणी केलेली आहे.मनपा हद्दीतील मालमत्‍ताधारकाकडे मालमत्‍ताकराची व त्‍यावरील व्‍याजाची रक्‍कम मोठया प्रमाणात थकीत असल्‍यामुळे कराधान नियम ५१ अन्‍वये मा.आयुक्‍त यांच्‍या मान्‍यतेप्रमाणे शास्‍ती (व्‍याज)मध्‍ये खालील प्रमाणे सुट देण्‍यात येत आहे.

१)    एप्रिल २०२१ ते ३० नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत जे मालमत्‍ताधारक आपल्‍याकडील थकीत व चालू आर्थिक वर्षाचा  २०२१-२२ चा मालमत्‍ताकराचा संपुर्ण कर भरणा करतील अशाच मालमत्‍ताधारकांना शास्‍तीमध्‍ये/व्‍याजामध्‍ये १००%  सुट देण्‍यात येत आहे.

२)    १ डिसेंबर  २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत जे मालमत्‍ताधारक आपल्‍याकडील थकीत व चालू आर्थिक वर्ष ३१मार्च २०२२ चा मालमत्‍ताकराचा संपुर्ण कर भरणा करतील अशाच मालमत्‍ताधारकांना शास्‍तीमध्‍ये/व्‍याजामध्‍ये ५०%  सुट देण्‍यात येत आहे.

 

            तरी शहरातील मालमत्‍ताधारक आपणाकडील थकीत व चालू कराचा भरणा करण्‍यासाठी www.propertytax.mclatur.in  या वेबसाईटद्वारे देखील भरू शकतात तसेच क्षेत्रीय कार्यालयात देखील मालमत्‍ता कराचा भरणा करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे तरी मालमत्‍ताधारकानी वरील दिलेल्‍या सवलतीचा लाभ घेवुन  मालमत्‍ताकराचा, पाणीपट्टीचा भरणा करण्‍याचे आहवान मा.आयुक्‍त  लातूर महानगरपालिका,यांनी केले आहे.


--




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या