*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या.... शिरूर अनंतपाळ येथील घटना.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ बीयूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की ,दिनांक 04/09/2021 रोजी रात्री मौजे साकोळ येथे राहणारे सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे,वय 35 वर्ष, यांनी त्यांचे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी नामे मनीषा सिद्धेश्वर शिंदे,वय 27 वर्ष, हिस छातीवर मारहाण करून छातीच्या बरगड्या मोडून हृदयास दुखापत होऊन हृदय फुटल्याने मरण पावली.त्यानंतर सिद्धेश्वर याने स्वतः चे राहते घराच्या सीलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मयताचे पोस्टमार्टम करण्यात आले असून सदर घटनेवरून पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.