■ चांगल्या उद्देशाने प्रेरीत कार्याची समाज दखल घेतो...
---- सोनाजी भंडारे.
◆ नांदगाव केंद्र शाळेत शिक्षकांचा सन्मान...
---- सोनाजी भंडारे.
◆ नांदगाव केंद्र शाळेत शिक्षकांचा सन्मान...
------------------------------
लातूर,दि.०६ - व्यापक विचार समोर ठेवून चांगल्या उद्देशाने प्रेरीत होवून केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल समाज घेतच असतो त्यामूळे आपण आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून उत्तम कार्य केले पाहिजे असे मत लातूर तालुक्यातील नांदगाव केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांनी व्यक्त केले.ते शिक्षकदिना निमित्त आयोजीत शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमात बोलत होते.सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाक्रष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यानंतर कोविड१९ काळातही आरोग्य,समुपदेशन व ऑनलाईन शिक्षणात यशस्वीपणे काम केल्यामूळे शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून शाळेतील शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी नांदगावचे सरपंच महादेव ढमाले,शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा निता घोडके,आईसाहेब प्रतिष्ठाणचे आधारस्तंभ प्रविण कदम,महेश साळुंके यांनीही शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की,शिक्षणामध्ये अमूलाग्र असे बदल होत चालले आहेत.तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत.शाळेतील बालकाला आज जागतीक स्पर्धेचे ज्ञान देणे गरजेचे असून त्यासाठी नियोजनपूर्वक शैक्षणिक कार्य होणे आवश्यक आहे.शिक्षकाच्या कार्याचा शाळेला व गावाला अभिमान वाटला पाहिजे असा कर्तव्यनिष्ठपणा शिक्षकाने अंगी बाणला पाहिजे तरच भावी पिढी संस्कारक्षम व कर्तव्यकठोर बनेल.
यावेळी शाळेतील शिक्षक नजीऊल्ला शेख,सुनिता पवार,जनाबाई घूले,प्रणिता नवगिरे,निलेश पवार आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भक्ती साळूंके,दिव्या दुनघऊ ,गोपाळ मूळे यांनी परिश्रम घेतले.
-----...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.