*स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 08 मोटारसायकली एकूण 2,60,000/- चा मुद्देमाल हस्तगत.*

 

                *स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 08 मोटारसायकली एकूण 2,60,000/- चा मुद्देमाल हस्तगत.*







लातूर रिपोर्टर न्यूज़ 

               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

             सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की पोलीस ठाणे विवेकानंद येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी गरुड चौक ,नांदेड नाका परिसरात त्याने चोरलेले मोटरसायकल विकण्याच्या प्रयत्नात परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने गरुड चौक, नांदेड नाका परिसरात सापळा लावला.माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे-


1) साहिल रज्‍जाक शेख, वय 17 वर्ष, राहणार- धानोरा ता. अंबाजोगाई जि. बीड ह.मु. बुरहान नगर, लातूर. यास पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा आणखी एक साथीदार याच्या 

मदतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या असून त्यापैकी 02 मोटारसायकली माझ्या घरा समोर लावलेल्या आहेत असे सांगितले. तसेच साहिल शेख याने सांगितल्याप्रमाणे सदरचे पथक   शिरूर अनंतपाळ येथे गेले  असता तेथे 06 मोटरसायकली मिळून आल्या . त्या सर्व चोरीच्या असल्याचे साहिल शेख यांनी सांगितले. सदरच्या सर्व  मोटरसायकली जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मोटर सायकलची माहिती खालील प्रमाणे.


1) *Honda Shine* (black colour)

   Chasers number

   MP4JC652DEF701888

   Engine number

   JC65E70057210



2) *TVS sport* (black colour)

Chasis number

MD625MF55166277

Engine number

CF5FA1465059


3) *TVS Victor* (gold colour)

Chasis number

IV3210M268927

Engine number

N3210F266669


4) *Hero Passion Pro* ( black colour)

Chasis number

07K03C31992 

Engine number

02K05E05M12119


5) *Hero HF deluxe* (black colour)

Chassis number

MBLHA11EVD9J02499

Engine number

HA119J51145


6) *Hero Honda Splendor* (black colour)

Chassis number

05D16F05659

Engine number

05D15E05807


7) *Hero Honda CD Deluxe* (black colour)

Chassis number

MBLHA11CD8908711

Engine number

HA11EA89J05155


8) *Hero Honda CD dawn*(black colour)

Chasis number

05C27E39823

Engine number

05C27E36532


          असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आले असून सदर चोरीच्या मोटार सायकलची पडताळणी केली असता पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 266/2021 कलम 379 भादवी व गुन्हा रजिस्टर क्रमांक 349/2021 कलम 379 भादवी. प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने जप्त मोटारसायकली व विधी संघर्ष बालक नामे साहिल शेख यास पुढील कार्यवाही व तपास करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांचेकडे देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस अंमलदार- अंगद कोतवाड,  माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, सदानंद योगी, मोहन सुरवसे,नकुल पाटील  यांनी बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या