रेणा नदीवरील बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग सुरू
औसा प्रतिनिधी
रेणा नदीला मागील दोन दिवसापासून झालेल्या पावसाने मुबलक पाणी आल्याने रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रेणा नदीच्या खोऱ्यात पाणी भरपूर साठल्यामुळे या नदीवरील श्रीक्षेत्र पांढरी येथील बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग 6 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आला. सोमवारी बैलपोळ्याच्या शुभमुहूर्तावर श्रीक्षेत्र पांढरी येथील बॅरेजमधून 4 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने आणखी 4 ते 5 दिवस पाऊस येण्याच्या अंदाज वर्तवल्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्याची खबरदारीची उपाययोजना म्हणून रेणा नदीवरील 4 बॅरेज मधून सोमवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.