निवडणुक आयोग व प्रशासनाने दखल नाही घेतल्यास, नवीन हद्दवाढीतील नागरिकांचा मतदान हक्कासाठी राष्ट्रवादी उच्च न्यायालयात दाद मागणार- अफसर शेख*

 *निवडणुक आयोग व प्रशासनाने दखल नाही घेतल्यास, नवीन हद्दवाढीतील नागरिकांचा  मतदान हक्कासाठी राष्ट्रवादी उच्च न्यायालयात दाद मागणार- अफसर शेख*

*राज्य निवडणुक आयोगाचे जिल्हाधिकारीना त्वरीत कारवाईचे आदेश*





*"नवीन हद्दीतील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादीचा लढा"*

नवीन हद्दवाढ परिसरात नवीन 3 वॉर्ड करावे-राष्ट्रवादी


निवडणुक आयोगाने वार्ड रचना संदर्भात जनगणना 2011 ची संख्या ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत, जनगणना 2011मधे नवीन हद्दवाढ परीसरात प्रगणक गट केले नव्हते  यामुळे नवीन हद्दवाढ परीसरातील मतदारांचा मतदानाचा न्याय हक्क डावलला जाणार आहे, जोपर्यंत मतदानाचा हक्क मिळणार व हक्काचा  लोकप्रतिनिधी या भागास मिळणार  तो पर्यत या भागाचा खरा विकास होणार नाही

औसा नगरपालिका हद्दीतील व शहरातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा पवित्र अधिकार आहे व त्यास मतदानापासून वंचित ठेवणे हे गंभीर कृत्य आहे  व शहरातील प्रत्येक वार्डात मतदारांची संख्या समप्रमाणात असणे ही नैसर्गिक न्याय तत्वाची बाब आहे. दिनांक 29/12 /2020 रोजी औसा नगरपालिकेची नवीन हद्दवाढ मंजूर झालेली आहे, जुनी हद्दवाढ होऊन साधारण 35 वर्षांचा कालावधी लोटला तरी अनेक वेळा प्रस्ताव पाठवूनही नवीन हद्दवाढ ही झाली नव्हती परंतु उक्त दिनांकास महाराष्ट्र शासनाने अधिसूचना निर्गमित करुन औसा शहराची हद्दवाढ मंजूर केली तसेच 1993च्या भूकंपानंतर औसा शहरात नवीन वस्ती वाढल्याने व ती वस्ती कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत नसल्याने त्या भागात सोयी सुविधा नाहीत, सदरहु  नवीन हद्दीत लोकप्रतिनिधी नसल्याने त्या भागाचा विकास झालेला नाही या भागातील नागरिकांनी अनेकदा आंदोलन करून विविध मार्गाने आपली भूमिका प्रशासनाकडे वेळोवेळी मांडली आहे या नवीन हद्दीतील वस्ती करिता प्रतिनिधित्वासाठी खालील बाबतीत राष्ट्रवादीने नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या वतीने लक्ष वेधले आहे या संदर्भात पुढील प्रमाणे मागणी  करण्यात आलेली आहे

1) जनगणना 2011 मध्ये नमूद प्रगणक गट हे नवीन हद्दी परिसरात आवश्‍यकतेपेक्षा कमी केल्याने त्या भागातील लोकसंख्येच्या विचार करण्यात आलेला नाही 2011 ते 2021 दरम्यान या भागात आणखीन नवीन लोकसंख्येत भर पडली असल्याने या नवीन वस्तीच्या भागात *लोकसंख्येचा नवीन सर्वे करण्यात यावा* औसा नगर परिषदेच्या सदस्य संख्या निश्चित करताना या सर्व झालेल्या *नवीन भाग ठिकाणी नवीन वार्ड करण्यात यावा* जेणेकरून या भागातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळेल अन्यथा या कामी दुर्लक्ष झाल्यास या भागात होणाऱ्या वार्ड ठिकाणी मतदारांची संख्याही शहरातील इतर वार्डा पेक्षा अधिक होऊ शकते तरी या बाबतीत काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करण्यात यावे व नगरपालिकेच्या वार्डच्या  एकूण संख्येत वाढ करण्यात यावी 2)नवीन हद्दवाढ परिसरामध्ये नाव नोंदी, नाव बदल, करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी 3)नवीन हद्द व परिसरात मतदार नोंदणीसाठी जनजागृती  करण्यात यावी तसेच शहरातील इतर  वार्डाची  रचना करताना यासंबंधी निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करावे.

 खरे पाहता निवडणूक आयोगाने दिनांक 29/12/20 रोजी शासनाने नवीन हद्दवाढीचे आदेश निर्गमित केल्या नंतर या भागांमध्ये पोटनिवडणूक लावून या भागातून नवीन प्रतीनिधित्वास संधी देणे आवश्यक होते परंतु निवडणूक आयोगाने या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केले आहे यासंदर्भात आणखी आणखी मुद्दे व सविस्तर निवेदन ही तेथील नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी लवकरच पाठविण्यात येईल वरीलप्रमाणे नागरिकांच्या जनहितार्थ व न्यायहक्कासाठी मागणी मान्य न झाल्यास मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे नागरिकांच्या वतीने मला न्याय मागण्यास मुभा राहील असे डॉ अफसर शेख, नगर अध्यक्ष, नगर परिषद औसा तथा  जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लातूर यानी सांगितले आहे यास राज्य निवडणुक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी लातुर याना यासंदर्भात आदेश दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या