पुस्तक प्रकाशन संपन्न
शिक्षक दिन उत्सव म्हणून साजरा होवू नये , या दिवशी विधायक कार्य व्हावे
🔸 इंडियन युथ असोसिएशन पुस्तक प्रकाशनात प्रा करजगीकर यांचे मत
सोलापूर - आध्रा प्रदेश च्या प्रसिद्ध इतिहास तज्ञ , उर्दू , तेलगू भाषेचे अभ्यासक लेखक नसीर सय्यद लिखीत व प्रा . वी .के. .पूर्णानंदमची अंग्रेजी अनुवादित पुस्तक "आधुनिक भारताच्या पहिली मुस्लिम शिक्षिका : फातीमा शेख " या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मा प्रा बी .एच. करजगीकर सह सचिव : हिंदी शिक्षक संघ यांच्या अध्यक्षते खाली व अय्यूब नल्लामंदू, प्राचार्य डॉ. इ. जा तांबोळी , ताहेर फडणीस, डॉ. उस्मान अ जब्बार नल्लामंदू , कवि मुबारक शेख, प्राचार्य डॉ. शकील शेख , इंजिनियर अस्लम सयद , हाजी बशीर बागबान , अ कुद्दूस नल्लामंदू, हाजी तज्जमुल चांदा , मा प्राचार्य सिराज मोमीन, यांच्या प्रमुख उपस्थित मोठया थाटाने संपन्न झाला ,
अब्दूल मन्नान शेख यांनी कुराण पठण केले ,इंडियन युथ असोसिएशन संस्थापक अय्यूब नल्लामंदू यांनी प्रस्ताविक करत संघटनेनी केलेल्या कार्याचा आढावा घेत नसीर सय्यद यांनी त्यांची पुस्तक प्रकाशनाची संधी व जबाबदारी दिल्या बदल त्यांचे आभार मानले, मजहर अल्लोळी , कुद्दूस नल्लामंदू यांनी मान्यवराना नॅपकीन-बुके देवून सत्कार केले
या नंतर सर्वांच्या हस्ते "फातीमा शेख " या पुस्तकाचा प्रकाशन करण्यात आला
. डॉ शकील शेख, ज्येष्ठ कवि मुबारक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या कंध्याला कांधा लावून स्त्री शिक्षणा चे द्वार बहुजनासाठी उघडले म्हणून आज त्याचा कौतुक होतो, त्यांनी या कार्यासाठी आपले जीवन अर्पित केले फातिमा शेख यांचे शिक्षणासाठी तन मनधन ने केलेला कार्य विरसता येणार नाहीं परंतु नवीन पिढीला याची माहिती होण्यासाठी जनजागृती सतत केली पाहिजे असे मत व्यक्त केले
बशीर बागबान म्हणाले - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात त्यांच्या संशोधन विभाग सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावे . डॉ. इ. जा. तांबोळी म्हणाले कि - सोलापूरात ल्या "उर्दू भवन " मधील कॉन्फरन्स हॉल ला "फातीमाबी शेख " नांव देण्याची मागणी केली
या नंतर प्रा बी. एच करजगीकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले - आपण प्रत्येक वर्षी शिक्षक दिन साजरा करतो , परंतु याचा स्वरुप उत्सव पेक्षा कमी नसतो आपण असे न करता या दिवशी. विविध कार्यक्रमाचा माध्यमानून विधायक कार्य करावे जेणे करुन नवीन पिढीला त्याचा फ़ायदा होईल
फातीमा शेख यांचे शैक्षणिक कार्य सर्व जाती धर्मासाठी प्रेरणादायी आहे आम्ही त्यांची फक्त एका.वर्षात एकदाच आठवण करत वार्षिक उत्सव साजरा करत असतो परंतु असे न करता त्यांचे कार्याला पुस्तक स्वरूपात जतन करत हा इतिहास सर्व सामान्य पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे . असे मत
व्यक्त केले
कार्यक्रमाचे उत्तम रित्या सुत्र संचलन
ग्रंथपाल जाफर बांगी यांनी केले तर आभार मजहर अल्लोळी यांनी मानले
या वेळी प्रोग्रेसिव्हचे ट्रस्टी ताहेर फडणीस, अॅक्ट चे मुहाफीज सय्यद , विरसाचे वसीम शाबाद, उर्दू परिषदचे अशफाक सातखेड , खा खादिमानचे रफीक खान, सर फौडेशनचे महमूद नवाज ,जनसंघटने चे महिबूब तांबोळी , आशियानाचे अस्लम सय्यद , हाजी शाकीर चाँदा ,फेमसचे कमर अल्लाेळी ,राष्ट्रवादीचे फारूक मटके ,.शमाचे असरार , आफताब नल्लामंदू व इतर साहित्य प्रेमी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.