रूग्णांना डोळस दृष्टी देण्याचे काम आपण राजकीय जीवनात करावे - अरविंद पाटील निलंगेकर

 

रूग्णांना डोळस दृष्टी देण्याचे काम
आपण राजकीय जीवनात करावे
- अरविंद पाटील निलंगेकर

लातूर दि.01/09/2021






  • दरवर्षी सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जातो. भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्च्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सर्व रोगनिदान शिबीर घेतले जाते गेल्या 13 वर्षापासून नेत्र तपासणी शिबीर घेण्याचे काम आपण सुरू केलेले आहे. या माध्यमातून तपासणी केलेल्या 11 हजार रूग्णांपैकी पैकी 700 ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टि देण्याचे काम आपण केलेले आहे. त्यामुळे आमुचे बंधू अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी अशा शिबीराच्या माध्यमातून सुरू असलेली ज्येष्ठांची सेवा अशीच कायम सुरू ठेवावी, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले.
यावेळी ते भाजपा युवा नेते तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व सर्व रोगनिदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक प्रकोष्ट सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, भाजपा युमोच प्रदेश सचिव अ‍ॅड.गणेश गोमचाळे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, डॉ.वेदांत अवस्थी, डॉ. संदिप क्षिरसागर, डॉ.आलिम शेख, डॉ.लखनगिरे, डॉ.सचिन निलंगेकर, डॉ.विष्णू पवार, डॉ.गिरवलकर, प्राचार्य मोहन खुरदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, लातूरकरांची गरज लक्षात घेवून पक्षाने तुम्हाला राजकारणात आणलेले आहे. सहजकता आणि जागरूकता तुमच्या अंगी असल्यामुळे पक्षाने तुम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे. कोरोना काळात अनेक जबाबदार व्यक्‍ती परदेशात होते. नेत्याची खरी परीक्षा संकट काळातच असते. ही बाब लक्षात घेवून आपण कोरोना काळात लोकांच्या अडचणीला पडलात. पक्षाला तुमचा गर्व आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचे आशीर्वादरूपी फलीतही मिळेल. त्यामुळे यापुढील कालावधीतही कव्हेकर साहेबांचा वसा व वारसा जपण्याचे काम तुम्ही करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.
प्रारंभी स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र विद्यालयाच्यावतीने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांना पुष्पहार करून अभिष्ठचिंतन करण्यात आले. या शिबीरामध्ये 1700 जणांची सर्वरोगनिदान तपासणी करण्यात आली. या पैकी 48 जणांना नेत्रशस्त्रक्रियेसाठी उदगीरला पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मोहन खुरदळे यांनी केले. तर प्राध्यापक मारूती सुर्यंवशी, मनपा गटनेते शैलेश गोेजगुंंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व अभार अब्दुल गालिब शेख यांनी मानले.

यावेळी या कार्यक्रमाला अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, गजेंद्र बोकन सागर घोडके, प्रेम मोहिते, शंभूराजे पवार, राहुल भूतडा, अनिकेत शेंडगे, रवी लवटे, महादेव पिटले, संतोष तिवारी, संतोष ठाकूर, संतोष जाधव, राजेश पवार यांच्यासह भाजपा युवा मोच्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श जीवंत ठेवण्याचे काम आपण करावे
सामाजिक व राजकीय कार्यामध्ये वाटचाल करीत असताना सामान्य घटकाला प्राधान्य देवून आपली वाटचाल सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नागरी बँकेच्या माध्यमातून 10 हजार बचतगटांच्या महिलांना उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्याचे काम आपण केलेले आहे. तसेच सव्वाशे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे काम केलेले आहे. तसेच मार्केट यार्डातील माथाडी कामगारांना माथाडी बोर्ड लागू करण्याचे काम केले. मी राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये अनेक महान व्यक्‍तीसोबत काम केलेले आहे. त्याला समाजातील एखादा आदर्शवान व्यक्‍ती मेला तरी चालेल परंतु त्याचे आदर्श जीवंत ठेवण्याचे काम आपण करावे. नितीमुल्यांची जपवणूक करून काम केल्यास जनता तुमच्या सदैव पाठीशी राहील, असे मतही भाजपा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केले.

माझ्या राजकीय वाटचालीचे श्रेय निलंगेकरांना
मला राजकारणामध्ये प्रारंभीच्या काळात फारसा रस नव्हता त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लातूरात येवून जेएसपीएम संस्थेचे काम पाहण्याचे काम सुरू केले. दरम्यानच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी आईच्या प्रचारासाठी फिरलो. आईने अडीच वर्ष महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम केले.  त्यांनतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कामे केली. तरीही माझ्या आईच्या पराभव झाला. त्या विषयाला साधारणतः सहा महिण्याच्या काळातच महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. अरविंद भैय्यांच्या आग्रहामुळे मी महानगरपालिकेसाठी उभा राहिलो. आणि सर्वसामान्य नागरिकांनीही मला साथ देण्याचे काम केले. महानगरपालिका नगरसेवक ते भाजपा युवा मोर्च्याच्या शहर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत माझी यशस्वी वाटचाल झाली. त्यामुळे माझ्या राजकीय वाटचालीचे श्रेय अरविंद भैय्यांनाच असेल, असे प्रतिपादन युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी मनोगतात बोलताना व्यक्‍त केले.
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या