वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील निवडणुका स्वबळावर लढणार जिल्हाअध्यक्ष जगदिश माळी

 वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील निवडणुका स्वबळावर लढणार जिल्हाअध्यक्ष जगदिश माळी





 औसा प्रतिनिधी


येणार्‍या नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार अशी माहिती जिल्हाअध्यक्ष जगदीशजी माळी बैठकीत बोलताना सांगितले भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाला नागरिक कंटाळले आहेत दिवसेंदिवस महागाईने डोके वर काढले आहे. गॅस, डिझेल, पेट्रोल यांचा भाव गगनाला भिडला आहे महागाई मुळे जनता गोरपळत आहे आजचे दिन येण्याऐवजी बुरे दिन आले आहेत यामुळे सर्व जनता वैतागली आहे वंचित बहुजन आघाडी हे पक्ष एका समाजाचा नसून सर्व जाती धर्माचा झाला आहे अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचावर विश्वास ठेवून सर्व जाती धर्माची लोक महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेत आहेत आज औसा तालुक्यात अनेक जाती धर्माच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला जिल्हाअध्यक्ष यांच्या हस्ते प्रवेश घेणाऱ्या सर्वाचे स्वागत करण्यात आले ०३ सप्टेंबर  रोजी शासकिय विश्रामगृह औसा तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतिने पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

  तालुकाध्यक्ष  शिवरूद्र बेरुळे यांच्या आध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष जगदिश माळी व जिल्हामहासचिव  तात्येराव वाघमारे यांच्या प्रमुख ऊपस्थितीमध्ये औसा तालुक्यातील आनेक गावातील कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला.

  यात प्रामुख्याने मराठा व मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.

     चंद्रशेखर माधवराव सुर्यवंशी,मोजेम युनुस पटेल,शाकिर पटेल,आस्लम पटेल, जहांगीर शेख,शंकर शाम देडे सर्व रा.मौजे नागरसोगा,रुषभ यशवंत ऊबाळे भादा, प्रतिक शिंदे नांदुर्गा,

         व महिला

   छाया दत्तु खरात,आशाबाई रामचंद्र कांबळे, मालन भिवा साठे सर्व रा.मौजे लखनगाव, आरती अनिल गायकवाड नागरसोगा,  रविना प्रकाश बनसोडे दापेगाव

  यांचा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष जगदिश  माळी व जिल्हामहासचिव डाॅ. तात्येराव वाघमारे यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला.

    सदरील कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी चे जेस्ट नेते  प्रभाकर सोनवते,  शाम पावले व सतिष गायकवाड (  जिल्हाउपाध्यक्ष),

  श्रावण कांबळे व  सुभाष भालेराव (  तालुका महासचिव),

  नागसेन गायकवाड, ईंद्रजित जाधव,सुर्यकांत ऊबाळे ( तालुका उपाध्यक्ष) विलास तपासे ( तालुका प्रसिधीप्रमुख)

   गंगाराम आडसुळे,रमेश आडसुळे, मुरली कांबळे, शाम देडे, सिताराम कावळे, भास्कर कांबळे मातोळा,किरन कांबळे, कैलास कांबळे, भिमा आडसुळे,बाबासाहेब कांबळे हजर होते.

  सदरील कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी केवळताई लकडे, संजय कांबळे, व धनराज लोखंडे यानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या