*उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यातील नर - मादी धबधबे सुरू*
दि. 6 - उस्मानाबाद -
तूळजापर तालुक्यातील नळदुर्गसह परिसरात शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला . या पावसामुळे बोरी धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असतानाच नळदुर्ग किल्ल्यातील नर - मादी हे दोन्ही धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत .
नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरण १०० टक्के तुटुंब भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सांडव्याद्वारे बोरी नदीतून पाणी महलात येत आहे . यामुळे ऐतिहासिक किल्यातील पर्यटकांचे खास आकर्षण असलेला नर - मादी धबधबा रविवारी ( दि .५ ) दुपारपासून वाहू लागला आहे . हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची किल्ल्यात गर्दी होत आहे . गतवर्षी कोरोनामुळे किल्ल्यात प्रवेश बंद होता . यंदा मात्र शासनाने किल्ला पर्यटकांसाठी खुला केल्याने नर - मादी धबधबा पाहता येणार आहे याची उत्सुकता पर्यटकांमध्ये आहे
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.