दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा युवा प्रतिष्ठान कडुन शिवभक्तीचा जागर

 दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

युवा प्रतिष्ठान कडुन शिवभक्तीचा जागर




24 सप्टेंबर 1674 रोजी छञपती शिवाजी महाराजांनी महंत निश्चल पुरी गोसावी यांच्या कडुन दुसरा शिवराज्याभिषेख करुन घेत.बहुजन समाजाला न्याय दिला महंत निश्चल पुरी यांना मानाचे स्थान दिले.याच कृतज्ञतेच्या भावनेतुन गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर च्या वतीने प्रत्येक वर्षी 24 संप्टेबर रोजी गेली अनेक वर्षा पासुन किल्ले रायगडावर दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहत साजरा केला जातो.पण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत.गोसावी समाज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हा दुसरा शिवराच्याभिषेक सोहळा कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंन्द्र लातुर येथे साजरा करण्यात आला.छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचा दुग्धअभिषेक करत शिवमुर्ती व महंत निश्चल पुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत.फुलांची उथळण करत शिवभक्तीचा जागर करण्यात आला.याप्रसंगी विविध क्षेत्रात नाविन्य पुर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी डाँ धर्मवीर भारती यांनी छञपती शिवाजी महाराज यांची आदर्श कार्य पध्दती सांगत दुसऱ्या शिवराज्याभिषेक संदर्भातला हतिहास सांगीतला.प्रास्तविकात अनिल पुरी यांनी सांगितलेकी भविष्यात या सोहळ्याची व्यापती वाढवुन हा सोहळा प्रत्येक वर्षी घराघरात सण म्हणून साजरा केला जाईल.या साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी भावना व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पुरी यांनी केले तर आभार सुरेखा भारती यांनी माडंले हा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी युवा प्रतिष्ठान च्या पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.या सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या