खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज
ऑनलाईन सोबत ऑफलाईनही गावातच स्विकारण्याच्या
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या प्रशासनाला सुचना
लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. १० सप्टेंबर २१)
लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवडयात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाईन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची विनंती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने पालकमंत्री देशमुख यांनी ऑनलाईन सोबत ऑफलाईन गावातच तलाठी कार्यालयात अर्ज स्विाकारण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे केल्या आहेत.
लातूर जिल्हयात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी व प्रशासनाने नुकसानीचे ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. तथापी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेमध्ये मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत. काही भागात इंटरनेट सुविधाही उपलब्ध नाही. याकरीता शेतकऱ्यांचे ऑफ लाईन अर्ज स्विकारावेत अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली. या संदर्भाने तात्काळ पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाला ऑनलाईन सोबत शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानीचे ऑफलाईन अर्ज गावातील तलाठी कार्यालयात स्विकारण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे आपले अर्ज गावातील तलाठी कार्यातयात करण्याचे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
-------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.