श्री गणराय! सुख समाधान घेऊन आले.
आले गणराया वाजत गाजत, आले ढोल ताशाच्या गजरात आले गणराय सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता आहेत. गणराया आपत्तीतून मुक्त करा. धर्म संस्कृतीचे अधिष्ठान श्री गणराया मूलाधार स्थिती, आधार स्थिती श्री गणराया आता आम्हाला कोवीड 19 मधून मुक्त करा. गणपती बाप्पा आपले शुभ आगमन सर्वत्र मोठ्या उत्साहाने होत आहे. लंबोदरा आपल्या आगमनाने सर्व चराचर सुखावले आहेत. आपल्या आगमनाच्या निमित्ताने थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळकांचे आम्हाला स्मरण होत आहे. त्यांनीच देव्हाऱ्यातील गणरायाला सार्वजनिक ठिकाणी आणले. शिवजयंती आणि गणेशोत्सव यांना सामाजिक स्वरूप दिले. सामाजिक आणि राष्ट्रीय चेतना जागृत केली.स्वातंत्र्यलढ्याला नवे रूप दिले. आज स्वातंत्र्योत्तर सुमारे 75 वर्षानंतर कोवीडच्या चक्रात अडकलो नव्हे त्या चक्रातून सुटका होत असताना आता गणराया आपले दर्शन नव्हे आपले दूरदर्शन होणार. या कल्पनेनेही आम्ही कासावीस होत आहोत. गणराया सद्विवेक-बुध्दी द्या, यामधून मार्ग दाखवा, आमच्या मदतीला धावून या, या विकासाची गाळात रुतलेले चक्री बाहेर काढायला. शिक्षणाची ज्ञानगंगा अखंड वाहू द्या. गणराया या आमची बुद्धी, मती स्वच्छ आणि शुद्ध करायला. आम्ही अंधारात चाचपडत आहोत. देवबाप्पा या शाळेची घंटा वाजवायला. बालकांना शाळेच्या प्रांगणात पुन्हा खेळू बागडू द्या. गणराया देवा बाप्पा या सत्वर धावून . गत वर्षात आमचे स्नेही, मित्र, गावकरी मोठ्या संख्येने पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली येथून मिळेल त्या वाहनाने नाही तर पायगाडीत (धावत ,पळत) वाटेत ना हॉटेल नाचहापाणी फक्त बिस्किट आणि पाण्याच्या बाटलीनी साथ संगत केली. बाप्पा या वर्षात आम्हाला कोवीड लस दिलीत. कोवीड पासून दूर आपल्या छत्रछायेखाली आम्हाला ठेवले. शाळा कॉलेज बंद होती, विद्यार्थी व गुरूजनात दुरावा, अध्ययन-अध्यापन ऑनलाईन, उद्योग व्यवसाय ठप्प, आशा काळात आवश्यक सेवेने तारले शेतकरी, सीमेवरील जवान, डॉक्टर्स, व्यापारी, परिचारिका, पोलीस, गृहखाते, शिक्षक यांनी मोलाची कामगिरी केली. पत्रकारांचे काम दुर्लक्षित नव्हेच. कोरोणामूळे माणसे सतत दडपणाखाली आहेत. सर्वांना पूर्वीप्रमाणे मुक्त श्वास घेऊ द्या. आपल्या किलकिल्या डोळ्यांनी पहात आसालच आमचे काय चालले आहे ते. या बाप्पा ज्ञानाच्या प्रकाशाने दाही दिशा उजळून टाकायला आज्ञानाला पळवून लावायला.गरिबी, अज्ञान, दारिद्र्याला पळून लावा. सर्वत्र सुजलाम सुफलाम होऊ द्या. जय जवान जय किसान जय विज्ञान गणराया आपल्या आशिर्वादाने शेती क्षेत्राने मोठीच कमाल केली. आज अन्नधान्याच्या बाबतीत शेतकरयांनी आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनवले याचा देशाला अभिमान आहे. आपले जवान डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासात सर्वांचाच कमी-अधिक प्रमाणात वाटा आहे.
चला उठा गाणेगाऊ गणरायाचे, गाणेगाऊ विकासाचे, गाणेगाऊ एकतेचे, सारे मतभेद मिटवून एकत्र येऊया गणराया बाप्पा या वर्षात रोगराई जाऊद्या मोकळा श्वास घेऊ द्या, विकास होऊ द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या लहान बाळांना खेळू ,बागडू द्याा, सर्वत्र आनंदी आनंद होऊद्या एवढिच प्रार्थना!
तूर्तास एवढे पुरे!
विलास कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार औसा 9552197268
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.