*उस्मानाबाद जिल्हयात बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक व अवैध विक्री करणाऱ्या ठिकाणावर अचानक छापे*
दि. 10 - उस्मानाबाद -
आज दिनांक 10.09.2021 रोजी मा.कौस्तुभ दिवेगावकर , जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हयात बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक करणाऱ्या ठिकाणी व अवैध विक्री करणा - या ठिकाणावर अचानक छापे / धाइ कार्यवाही करणेसाठी महसुल व पोलीस विभागाची एकत्र पथके तयार करून कार्यवाहीचे आदेश दिले . तुळजापुर तालुक्यात मा.उप विभागीय अधिकारी उस्मनाबाद यांचे उपस्थितीत आज रोजी अचानक धाडसत्र राबविले असता पुढील पाच ठिकाणी बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक व विक्री करताना कार्यवाही करण्यात आली .
सोलापुर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत जयशंकर धाब्याच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये Rivo कंपनीच्या पिवळया रंगाच्या 04 टाक्यात प्रत्येकी 2000 लिटर आणि एका पांढ - या रंगाच्या टाकीत 500 लिटर बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थ आढळुन आला या ठिकाणी एकुण 8500 लिटर ज्वलनसिल पदार्थ आढळुन आला असुन त्याची अंदाजे बाजार किंमत 6,80,000 इतकी असुन सदर द्रव जप्त करण्यात आलेला असुन उर्वरित 08 टाक्या रिकाम्या आढळुन आल्या . उपरोक्त सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आलेले असुन ते पुढील चौकशीसाठी पोलीसांकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे . सदर प्रकरणात श्री दिनकर प्रभाकर सुरवसे वय 35 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .
मौजे अलियाबाद शिवारातील सोलापुर ते हैद्राबाद जाणारे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामदेव हॉटेलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये एका मोठा टँक आढळुन आला त्यामध्ये अंदाजे 600 ते 650 लिटर डिझेल सदृष्य पदार्थ आढळुन आलेला असुन त्याठिकाणचे सर्व साहित्य ताब्यात घेतलेले असुन सर्व वस्तुचा ताबा एन.डी.सुरवसे पोना / 1170 यांच्या सुपुर्द केलेला आहे . सदर प्रकरणात श्री सचिन दगडु हासुरे वय 35 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .
3 जळकोट रोडवरील हॉटेल गणेश धाबा येथे एक केशरी बॅरेलमध्ये एक पानबुडी मोटार , बाजुला अर्धा इंच पाण्याची मोटार , व एक इलेक्ट्रीक स्टार्टर आढळुन आला . आढळुन आलेल्या 09 टाक्यापैकी 06 टाक्यामध्ये एकत्रित मिळुन 450 लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ आढळुन आला . सदर सर्व वस्तु ताब्यात घेण्यात आलेल्या असुन सदर प्रकरणात सत्यनारायण शिवाजी कदम वय 34 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .
मौजे जळकोट शिवारातील हॉटेल गारवा च्या मागील बाजुस स्टोअर रूम , रेस्ट रूम मध्ये दोन नोझल मशीन , एक जनरेटर , एक अर्धा इंच पाण्याची मोटार ताब्यात घेण्यात आले आहे . तसेच पिवळे मोठे 04 बरेल , निळे ०३ बॅरेल , हिरवे ०२ मोठे बॅरेल आणि निळे प्लास्टीकचे मध्यम ०३ व छोटे 04 बॅरेल सर्व रिकामे स्थितीत आढळून आले . तथापि बॅरेल मधील बायोडीझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थ कार्यवाहीच्या भीतीने नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही . निळया मोठया 04 बॅरेलपैकी एका बॅरेलमध्ये अंदाजे 20 लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ आढळुन आला . तसेच लोखंडी कापलेल्या बरेलमध्ये अंदाजे 05 लिटर द्रव आढळुन आला . सदर सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले असुन सदर प्रकरणात श्री खासिम पापुन जमादार वय 53 रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .
5 ) मौजे जळकोट शिवारातील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील बाजुस पत्र्याच्या शेडमध्ये 2000 लिटरचे सरीता कंपनीचे ०५ बॅरेल रिकामे दिसुन आले . परंतु सदर बरेलमधील बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थ पथकाच्या कार्यवाहीच्या भीतीने नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही . सदर बॅरेलचा गंध हा बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचा आढळुन आला आहे . तसेच निळया रंगाचे 35 ते 40 लिटर क्षमतेचे सात रिकामे बॅरेल सुद्धा आढळुन आले . सदर बॅरेलचा गंध हा बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचा होता . जायमोक्यावर डिझेल भरण्यासाठीचे एक नोजल आणि अंदाजे ०५ लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचा एक प्लास्टीक कॅन आढळुन आला . सदरचे सर्व साहीत्य ताब्यात घेण्यात आलेले असुन सदर प्रकरणात श्री शेषेराव शंकर काळे वय 45 वर्ष रा जळकोट ता तुळजापुर यांचेवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .
उपरोक्त नमूद बायोडिझेल सदृश्य ज्वलनषिल पदार्थाचे अंदाजे बाजार मूल्य रु .7,70,400 / - इतके असून ताब्यात घेतलेल्या साहित्याची किंमत अंदाजे रु .5,40,000 / - इतके आहे .
सदर कार्यवाही मध्ये योगेष खरमाटे उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद , सौदागर तांदळे तहसिलदार तुळजापुर , जगदीष राऊत सपोनि पो स्टे नळदुर्ग , अमित भारती नायब तहसिलदार तुळजापुर , संदीप जाधव नायब तहसिलदार तुळजापुर , संतोष पाटील नायब तहसिलदार तुळजापुर , अमर गांधले मंडळ अधिकारी नळदुर्ग , नेमचंद शिंदे मंडळ अधिकारी इटकळ , पवन भोकरे मंडळ अधिकारी जळकोट , अशोक भातभागे , परमेश्वर शेवाळे , आबासाहेब सुरवसे , गणेश जगताप , दयानंद काळे , तुकाराम कदम , ( सर्व तलाठी ) तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशन मधील सपोफौ / 429 जोशी , पोह / 900 कांबळे , पोह / 1251 बांगर , पोह / 487 गायकवाड , पोना / 1170 सुरवसे , पोकॉ / 1851 सगर , पोकॉ / 1681 पाटील यांनी सहभाग नोंदविला .
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.