*वर्गणीच्या नावावर खंडणी मागणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाणे अमदपुर येथे गुन्हा दाखल*
लातूर रिपोर्टर न्यूज़ बीयूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 04/09/2021 रोजी दुपारी 12:30 वाजण्याचे सुमारास पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीतील नांदेडला जाणारे रोडवर, राळगा पाटी येथे दोन इसम रस्त्यावर थांबून येणारे जाणारे वाहने अडवून त्यांच्याकडून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे घेत आहेत.अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन अहमदपूर येथील सपोनि केदार हे पोलीस अमलदारसह तात्काळ राडगा पाटी येथे पोहोचून पाहणी केली. तेथे माहिती प्रमाणे दोन इसम हातात पावती बुक घेऊन रस्त्यावरून जाणारे वाहने अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेत असताना मिळून आले.पोलिसांनी त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) नागनाथ बापूराव देवकते, वय 30 वर्ष, राहणार राळगापाटी,ता.अहमदपूर
2)बालाजी किशन माने, वय 17 वर्ष, राहणार राळगापाटी ता.अहमदपूर.
असे असल्याचे सांगून आम्ही वाहन चालकाकडून गणपतीची वर्गणी गोळा करत आहोत असे सांगितले.
सदर इसम हे रस्त्यावर थांबून गणपतीचे पट्टीचे नावाखाली रोडवरून येणारे-जाणारे वाहनांना अडवून त्यांच्याकडून खंडणी मागून घेत असताना मिळून आल्याने पोलीस अंमलदार लक्ष्मण आरदवाड यांनी दिलेल्या फिर्याद वरून नमूद इसम विरोधात पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 393/2021 कलम 341, 384, 34. भा.द.वि. प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपी नामे नागनाथ बापूराव देवकते यास अटक करण्यात आली असून आज रोजी मा.न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.लाकाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस अमलदार केंद्रे हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.