तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसाचा दणका
अनेकांचा ऊस झाला भुईसपाट
ऊस उत्पादक शेतकऱ्याची उडाली झोप
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यात शनिवारी रात्री अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्याचे लागवड केलेल्या ऊस मोठ्या प्रमाणात वादळाने भुईसपाट झाली आहेत.यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उत्पादन मध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही
औसा तालुक्यातील गुळखेडा,भादा सह तालुक्यात शनिवारी दि 4 सप्टेंबर रोजी रात्री 6 अचानक विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक शेतकरी बांधव यांचे ऊस भुईसपाट झाल्यांचे दिसत होते.खुप दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र असणाऱ्या गुळखेडा,भादा,सह अनेक गावांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ऊस आडवा पडल्याने उसाचे वजन घटण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधव करत आहेत.
*आडव्या उसाचा पंचनामा करून मदत द्यावी*
गुळखेडा येथील शनिवारी रात्री अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने आमच्या जवळ पास एक दोन एक्कर वरील ऊस भुईसपाट झाला असून त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.या आडव्या पडलेल्या ऊसाला उंदीर लागून खुप नुकसान होते.त्यामुळे शासनाने तात्काळ ऊसाचे पंचनामे करून मदत द्यावी अशी विनंती आहे
अमोल शिंदे
शेतकऱ्यांची पोरं
गुळखेडा शाखाध्यक्ष
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.