ॲड मुजीबोद्दीन पटेल यांच्या स्मरणार्थ ८३० वृक्षांची लागवड

 ॲड मुजीबोद्दीन पटेल यांच्या स्मरणार्थ ८३० वृक्षांची लागवड






औसा (प्रतिनिधी) औसा नगर परिषदेचे सतरा वर्ष नगराध्यक्ष असलेले कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष ॲड मुजीबबोद्दीन पटेल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त औसा शहरातील खाकीशफ़ा दरगाह परिसरात ८३० झाडांची लागवड करण्यात आली.ॲड मुजीबोद्दीन पटेल हे 83 वर्ष जगले आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ सेवा करीत औसा नगर परिषदेवर सतरा वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. औसा शहरातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन नगरपालिकेवर साम्राज्य निर्माण करीत शहराच्या विकासामध्ये आणि शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले त्यांची आठवण राहावी म्हणून फक्रोद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटी औसा ग्रीन वृक्ष टीम औसा यांच्या संयुक्त विद्यमाने खाकीशफा दर्गा परिसर, एमआयडीसी व औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.या वेळी ॲड समियोद्दीन पटेल,मोहमद मुस्लिम कबीर,

सय्यद हामिद,शमशूल हक काझी,आसिफ पटेल,इलियास चौधरी,आफताब शेख,अजहर पटेल सह आदींनी पुढाकार घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या